शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

विद्यापीठाचे उपकेंद्र १ आॅगस्टपासून सुरू

By admin | Updated: June 14, 2014 23:50 IST

मुंबई विद्यापीठाचे ठाणे उपकेंद्र येत्या १ आॅगस्टपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती कुलगुरू डॉ. नरेशचंद्र यांनी दिली.

गोकुळ भवरे, किनवटबंजारा आणि आदिवासी मतदारांचे प्राबल्य असलेल्या किनवट विधानसभा मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत सर्वपक्षीय विरोधक कोणती रणनीती आखतात, याकडेच सर्वांचे लक्ष आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत कलह नसला तरीही पक्षाच्या उमेदवाराला भाजप-शिवसेना, इतर पक्षातील विरोधक एक होणार नाहीत यासाठी आ. प्रदीप नाईक यांना नवे डावपेच खेळावे लागतील, असे सध्याचे चित्र आहे.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत किनवट विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आघाडीच्या उमेदवाराला निर्णायक मताधिक्य मिळाले आहे. विधानसभेला आमदार नाईकांव्यतिरिक्त दुसऱ्या कोणला मैदानात उतरवतील, असे वाटत नाही. आ. नाईक विजयाच्या हॅट्ट्रीकवर आहेत.या मतदारसंघाच्या इतिहासात एकाही उमेदवाराने हॅट्ट्रीक साधली नाही. कै. उत्तमराव राठोड, कै. किशनराव पाचपुते व डी. बी. पाटील यांनी प्रत्येकी दोनवेळा प्रतिनिधित्व केले. या रांगेत आता प्रदीप नाईक यांचे नाव लागले आहे. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत माजी आमदार, आदिवासी नेते भीमराव केराम यांनी भाजपाच्या तिकिटावर प्रदीप नाईक यांना तुल्यबळ लढत दिली होती. परंतु नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आ. नाईक यांच्यासमवेत केराम अग्रेसर होते. या मतदारसंघात बंजारा विरुद्ध आदिवासी अशी नेहमीच लढत होत आली आहे. त्यात दलित, मुस्लिम मते निर्णायक भूमिका बजावतात. दलित, मुस्लिमांची मते मिळविणारा हमखास यशस्वी होतो, असा इतिहास आहे. बंजारा समाजाचे प्रदीप नाईक व आदिवासी नेते भीमराव केराम सध्यातरी एकत्र असल्याने आगामी काळात राजकीय पटलावर काय व कशी उलथापालथ होईल, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, विरोधी पक्षाला गत पाच वर्षांत डोळ्यात भरेल असे आंदोलन छेडण्यात यश आले नाही. भाजपाकडे उमेदवार कोण असावा, याचीच चर्चा आहे. धरमसिंग राठोड, नगरसेवक दिनकर चाडावार, संघटनमंत्री सुधाकर भोयर, शिवसेनेकडून डॉ. बी. डी. चव्हाण, ज्योतिबा खराटे हे इच्छुक आहेत. अपक्ष किंवा इतर पक्षाकडून तिकीट मिळवून माजी नगराध्यक्ष इसा खान, प्रफुल्ल राठोड, असद खान किनवटकर, मनसेकडून धनलाल पवार, माकपकडून कॉ. अर्जुन आडे, भाकपकडून गंगारेड्डी बैनमवाड आदींची नावे इच्छुकांच्या यादीत आहेत. विरोधकांची खेळी काय असेल, यावरच बरेच काही अवलंबून आहे. राष्ट्रवादीशी लढण्यासाठी खरोखरच सर्वच विरोधी पक्षांनी एका बाकावर बसून सर्व शक्तिनिशी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्यास त्याला विजयाच्या निर्धाराचीही धार असावी लागणार आहे. नुसता निर्णय घेणेही धोक्याची घंटा वाजवेल, अशी चर्चा राजकीय जाणकारांतून व्यक्त होत आहे. भाजपा भीमराव केराम  ५१४८३भाकप कॉ. अर्जुन आडे  १२६०० राष्ट्रवादी काँग्रेस प्रदीप नाइक  ६९६४५इच्छुकांचे नाव पक्षप्रदीप नाईक राष्ट्रवादी काँग्रेस धरमसिंग राठोड  भाजपाज्योतिबा खराटे  शिवसेनाबी. डी. चव्हाण  शिवसेनालोकसभा निवडणुकीत राजीव सातव (कॉंग्रेस) यांना २०३२ एवढे मताधिक्य