शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

नेरळमधील युनियन बँकेचे व्यवहार ठप्प; पेन्शनर, खातेदार संतप्त; उपाययोजना करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 00:02 IST

नेरळ गावातील सर्वात जुनी बँक असलेल्या युनियन बँकेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे.

नेरळ : नेरळ गावातील सर्वात जुनी बँक असलेल्या युनियन बँकेचा कारभार पुन्हा एकदा ठप्प झाला आहे. येथील इंटरनेट सेवा ही गेल्या दहा दिवसांपासून बंद असल्याने नेरळमधील बँकेचे खातेदार आणि पेन्शनर संतापले आहेत.

नेरळमधील युनियन बँक ही येथील पहिली बँक असल्याने त्या शाखेत तब्बल ३० हजार खातेदार आहेत. त्या खात्यांपैकी दहा हजारांहून अधिक खाती ही करंट खाती असून, नेरळमधील सर्व व्यापाºयांची खाती नेरळमधील एकमेव राष्ट्रीयकृत बँकेत आहेत. मात्र, या बँकेत सातत्याने इंटरनेट सेवा बंद असल्याने मोठ्या प्रमाणात नेरळमध्ये आलेल्या अन्य बँकेकडे खातेदार वळले आहेत. त्यात युनियन बँकेच्या शाखेत सरकारी कर्मचारी असलेले पेन्शनर हे महिन्याच्या पहिल्या तारखेला एकत्र येत असतात.

मात्र, या वेळी दहा दिवसांपासून बँकेची इंटरनेट सेवा बंद असल्याने ५ डिसेंबरपर्यंत सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे साधारण १ तारखेपासून पेन्शनवर अवलंबून असलेल्या वयोवृद्ध पेन्शनरची बँकेबाहेर गर्दी दाटत आहे. बँकेच्या या आउट आॅफ कव्हरेज नेटवर्कचा या ज्येष्ठ नागरिकांना मोठा फटका बसत आहे. तासन्तास बँकेबाहेर ताटकळूनही त्यांना पैसे मिळत नसल्याने त्यांची मोठी फरफट होत आहे.

बँकेला इंटरनेट सेवा देणाºया बीएसएनएलकडून इंटरनेट सेवा सुरळीत नसल्याने सातत्याने बँकेचे व्यवहार बंद पडत आहेत. ही बाब सातत्याने निर्माण होत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. युनियन बँकेच्या ठाणे येथील विभागीय कार्यालयाने नवीन इंटरनेट सेवा घेण्यासाठी यंत्रणा उपलब्ध केली आहे. मात्र, ही यंत्रणा अजून कार्यान्वित झाली नसल्याने बीएसएनएलवरच बँक अवलंबून आहे. त्यामुळे बँकेतील खातेदार, पेन्शनर, ग्राहक वैतागले असून, बँकेच्या आउट आॅफ कव्हरेज कामाविषयी संताप व्यक्त केला जात आहे. लवकर उपाययोजना करून व्यवहार सुरू करण्याची मागणी होत आहे.

रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने रस्ता खोदला त्यात बीएसएनएलच्या वाहिन्या तुटल्या आहेत. असे बीएसएनएलने सांगितले आहे. त्यामुळे केवळ आमच्याकडेच नाही तर सगळीकडे इंटरनेट बंद आहे. यामुळे ग्राहकांची गैरसोय होत आहे. मात्र, बँकेचे कामकाज पूर्णपणे ठप्प नसून ग्राहकांना थोडेथोडे करून पैसे दिले जात आहेत. सोमवारपर्यंत इंटरनेट सेवा सुरळीत होऊन बँकेचे कामकाज व्यवस्थित होईल.- अदिती म्हात्रे, व्यवस्थापक

युनियन बँक ही नेरळमधील पहिली राष्ट्रीयकृत बँक आहे. त्यामुळे पूर्वीपासून या बँकेत आम्ही खातेदार आहोत. मात्र, आजच्या डिजिटल युगात बँकेतील इंटरनेट कायम गुल असते. त्यामुळे आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हे कायम घडत असते. सोमवारपर्यंत जर बँकेचे कामकाज सुरळीत झाले नाही, तर आम्ही या बँकेस टाळे ठोकू.- अरविंद कटारिया,

नेरळ व्यापारी फेडरेशन

गेले काही दिवस मी नेरळमधील युनियन बँकेत फेºया मारतोय. मात्र, बँकेचे नेट नसल्याने बँकेतील माझे काम होत नाही. मी व्यावसायिक असल्याने सारखे बाहेर येणे-जाणे असते. मात्र, बँकेत वेळ जास्त जात असल्याने इतर कामांची पुरती वाट लागते. अनेक वृद्ध पेन्शनर बँकेबाहेर आपली पेन्शन घेण्यासाठी सकाळपासून येऊन बसतात. ऊन, थंडी कशाचीही तमा न बाळगता उपाशी तापाशी ते बँकेबाहेर बसत असल्याचे पाहून मन हेलावले. बँकेमध्ये विचारणा केली की विनाकारण वादावादी होते. नेरळमधील युनियन बँक म्हणजे डोकेदुखी झाली आहे.- विनायक क्षीरसागर, खातेदार

टॅग्स :bankबँकInternetइंटरनेट