शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
4
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
5
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
6
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
7
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
8
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
9
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
10
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
11
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
12
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
13
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
14
फायद्याची गोष्ट! स्टील, अ‍ॅल्युमिनियम की लोखंड... स्वयंपाकासाठी कोणतं भांडं सर्वात बेस्ट?
15
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
16
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
17
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
18
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
19
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
20
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली

"छोटा रिचार्ज येवून गेल्याचं समजलं"; ठाकरे-केजरीवाल भेटीवर ओवेसींची टीका

By कमलाकर कांबळे | Updated: February 25, 2023 17:06 IST

"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात"

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छोटा रिचार्ज येवून गेल्याचे समजते, अशा शब्दात असदुद्दीन ओवेसी यांनी या भेटीवर मिश्कील टिप्पणी केली. मोदी आणि शहा यांच्या हातातील तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शहा यांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन मुंबईत होत आहे. याचीच माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे शनिवारी परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यासह सोळा राज्यातील पक्षाचे खासदार, आमदार आणि पक्षांचे अध्यक्ष उपस्थित होते.

केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे. हरियाणा आणि राजस्थानमध्ये अल्पसंख्यांकावर अन्याय होत आहेत. पिडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी कॉंग्रेस भारत जोडो यात्रेत मग्न आहे. लव्ह जिहादच्या मोर्चामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टिका ओवेसी यांनी केली. लोकभावना विचारात न घेता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव, असे नामकारण करण्यात आले आहे. त्याचा ओवेसी यांनी यांनी यावेळी निषेध केला. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कशी आघडी करायची याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

औरंगाबाद शहराच्या नामकारणाला आमचा विरोध आहे. त्यासाठी आम्ही मोर्चाही काढला होता. मात्र त्यानंतरही नामकारण करण्यात आले. आता नामकारण झालेच आहे, तर सरकारने या शहरातील जीवनमान सुधारण्यावर भर द्यावा, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवाव्यात, पाण्याचा प्रश्न मार्गी लावाला. केवळ नाव बदलून हे शक्य होणार नाही, याची सरकारलाही जाण आहे. एकूणच जनतेच्या भावनेशी हा खेळ असून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहिल, असे इम्तियाज जलील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीUddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालEknath Shindeएकनाथ शिंदे