शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

अनधिकृत लॉजिंगला महापालिकेचे अभय

By admin | Updated: November 13, 2016 01:42 IST

अतिक्रमणाचा ठपका ठेवून महापालिकेने प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, मार्जिनल स्पेस विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई

- नामदेव मोरे, नवी मुंबई

अतिक्रमणाचा ठपका ठेवून महापालिकेने प्रकल्पग्रस्तांची गरजेपोटी बांधलेली घरे, फेरीवाले, मार्जिनल स्पेस विरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. सामान्य नागरिकांवर कारवाई होत असताना दुसरीकडे तब्बल शहरात तब्बल ७३ अनधिकृत लॉजिंग- बोर्डिंग सुरू असून त्यांच्यावर काहीही कारवाई केली जात नाही. अनधिकृतपणे व्यवसाय करून व सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून करोडो रुपये कमवणाऱ्यांवर कारवाई का नाही, असा प्रश्न रहिवासी विचारू लागले असून गरिबाला बेघर करण्याअगोदर सर्वप्रथम अवैधपणे व्यवसाय करणाऱ्यांचे बांधकाम हटवण्याची मागणी केली जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेने मे पासून अनधिकृत बांधकामांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचे प्रथम स्वागत करण्यात आले होते; पण पाच महिन्यांच्या कार्यकाळात फक्त सामान्य नागरिकांवरच कारवाई झाली आहे. मोठ्या व्यापारी व उद्योगपतींवर ठोस कारवाई झालेलीच नाही. एपीएमसी, इनॉर्बिट व इतर अनेक कारवाई प्रकरणी न्यायालयाने स्थगिती दिली आहे. पावसाळ्यात तीन महिने बंद असलेली कारवाई आता पुन्हा सुरू झाली आहे; पण या वेळीही दिशाहीनपणे मनात येईल तिथे कारवाई होत आहे.माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीमध्ये शहरातील ८३ लॉजिंग-बोर्डिंग बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे २५ लॉजिंग व बोर्डिंग पूर्णपणे अनधिकृत आहेत. परवानगी न घेताच इमारती उभ्या करून त्यावर लॉजिंगचे व्यवसाय सुरू केले आहेत. २० लॉजिंग व बोर्डिंगसाठी बांधकाम व भोगवटा प्रमाणपत्र घतलेले नाही. काही निवासी जागेवर तर काही ठिकाणी वाणिज्य, वेअर हाऊस, गोडावूनसह सर्विस इंडस्ट्रीसाठी राखीव असलेल्या जागेवर हॉटेल सुरू केलेली आहेत. अतिक्रमणमुक्त नवी मुंबई मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे; पण पक्षपाती कारवाई व प्राधान्यक्रम निश्चित केलेला नसल्याने ही मोहीम पूर्णपणे फसली आहे. गरीब, कष्टकरी नागरिकांवर कारवाई होत असून धनदांडग्यांना अभय मिळत असल्याचे हॉटेलप्रकरणांवरून स्पष्ट झाले आहे. शहरातील अधिकृत दुकानदारांनी पावसापासून साहित्याचे नुकसान होऊ नये यासाठी उभारलेले वेदर शेडही पालिकेने हटवले; परंतु ज्यांनी पूर्ण बांधकामच अनधिकृत केले आहे. निवासी जागेवर लॉजिंग सुरू केले आहे त्यांना मात्र अभय देण्यात येत आहे. पालिकेच्या दुटप्पी भूमिकेविषयी नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. कारवाई करण्यासाठी फक्त गरिबांच्या घरांनाच प्राधान्य का? असा प्रश्न रहिवाशांनी विचारला आहे. हॉटेलच्या परवानगीमागे अर्थकारण असल्याचा आरोप होऊ लागला असून स्थायी समितीमध्ये आवाज उठवल्यानंतरही प्रशासनाने अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. लॉजिंग-बोर्डिंगच्या अतिक्रमणाचे स्वरूप- सर्विस इंडस्ट्रीसाठी राखीव भूखंडावर विनापरवाना लॉजिंग सुरू. - टेरेस बंधिस्त करून त्या जागेचा लॉजिंगसाठी वापर.- गोडावूनमध्ये पार्किंगसह अनधिकृत रूम तयार केल्या आहेत.- वाहनतळाचा व्यावसायिक वापर सुरू केल्याने रोडवर पार्किंग.- वाणिज्य कार्यालयाच्या जागेवर लॉजिंगसाठी रूमची उभारणी. - तळमजल्यावर दुकानांचे एकत्रीकरण करून लॉजिंगसाठी वापर. - अनेक लॉजिंग-बोर्डिंगची नस्तीच उपलब्ध नाही. परवानगी व भोगवटा प्रमाणपत्र नसलेली हॉटेल्स हॉटेलविभागरघुनाथ गेस्ट हाऊस बेलापूरहॉटेल न्यू मिनी महलनेरूळहॉटेल बलदेव पॅलेसनेरूळ गेस्ट पॉर्इंट लॉजिंगशिरवणे वाशी इन लॉजिंगवाशीसंकल्प लॉजिंगजुहूगावसाईपरिक्रमा गेस्ट हाऊस जुहूगावहॉटेल शरण जुहूगावसपना लॉजजुहूगावदर्शना लॉजिंगजुहूगावअल्फा रेसिडेन्सीजुहूगावसागरकृपा गेस्ट हाऊस तुर्भे हॉटेल रेक्स प्लाझा तुर्भे हॉटेल सेल ईन लॉजिंगतुर्भे कलश लॉजिंगतुर्भेमॉर्डन गेस्ट हाऊस तुर्भे अपोलो गेस्ट हाऊस तुर्भे हॉटेल अपेक्स लॉजतुर्भे हॉटेल नवी मुंबई तुर्भे हॉटेल इंडियाना इनतुर्भे राजेश हॉटेल्स अ‍ॅण्ड मोटेल्स ऐरोली निवासी जागेवर सुरू असलेली हॉटेल्सकोहिनूर पॅलेस लॉजिंगशिरवणेहॉटेल बलदेव पॅलेसशिरवणेकोनार्क इन लॉजघणसोलीसाईश्रद्धा हॉटेलघणसोलीकृष्णा अवतार स्टे इनदिवाळेगाववेअर हाऊसिंगच्या जागेवर उभारण्यात आलेले हॉटेल्सखालसा इंटरप्रायजेस तुर्भे प्रिया गेस्ट हाऊस तुर्भे हॉटेल यश्मिर लॉजतुर्भे कुबेर हॉस्पिटॅलिटीतुर्भे न्यू बॉम्बे व्यापार प्रा. लि.तुर्भे साई साक्षी हॉटेल तुर्भे हॉटेल कपलतुर्भे सर्विस इंडस्ट्रीजच्या जागेवर लॉजिंग गंगासागर रेस्टॉरंट अ‍ॅण्ड लॉजिंगनेरूळ-सेक्टर १३हॉटेल सिल्व्हर पॅलेस नेरूळशहरातील विनापरवाना हॉटेलची माहिती हॉटेलविभागतारा हॉस्पिटॅलिटी सर्विसेसबेलापूरकृष्णा अवतार स्टे इनबेलापूरकोहीनूर पॅलेस लॉजिंग-बोर्डिंगनेरूळगेस्ट पॉर्इंट लॉजिंगनेरूळ हॉटेल सनराईज लॉजिंग-बोर्डिंगनेरूळहॉटेल डायमंड पॅलेसशिरवणेऐश्वर्या लॉजिंग-बोर्डिंग नेरूळ हॉटेल बलदेव पॅलेसशिरवणेराजमहल रेस्टॉरंटशिरवणेहॉटेल सिल्व्हर पॅलेस इनजुहूगावसंकल्प लॉजिंगजुहूगावसाईपरिक्रमा गेस्ट हाऊसजुहूगावहॉटेल शरणजुहूगावसपना लॉजजुहूगावदर्शना लॉजिंगजुहूगावअल्फा रेसिडेन्सी कोपरखैरणेस्पायसेस रेस्टॉरंट लॉजकोपरखैरणेकोनार्क इन लॉजघणसोलीसाईश्रद्धा हॉटेलघणसोलीराजेश हॉटेल्स अ‍ॅण्ड मोटेल्सऐरोलीहॉटेल रॉयल पार्करामनगर, दिघाहॉटेल इलाईट इनपावणेब्रह्मराज लॉजिंगरबाळे मोनार्च लॉजिंगरबाळेनिवासी व वाणिज्य जागेवरील हॉटेल्सहॉटेल न्यू मिनी महलशिरवणेहॉटेल सनराईज लॉजिंग शिरवणेहॉटेल डायमंड पॅलेस शिरवणेऐश्वर्या लॉजिंगनेरूळहॉटेल ब्लू डायमंडवाशी हॉटेल जयप्रभाबेलापूरहॉटेल अश्विथ बेलापूरहॉटेल प्लाझा लॉजिंग हाऊस बेलापूर हॉटेल सी व्ह्यूबेलापूरके स्टार लाजिंग हाऊस बेलापूर हॉटेल सी शोअर बेलापूर पाम स्टार लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंगबेलापूर मनिषा इंटरनॅशनलबेलापूरमहेश रेसिडेन्सी बेलापूरतारा हॉस्पिटॅलिटी सर्विसेस बेलापूर वाशी इन लॉजिंगवाशी रेक्स प्लाझा लॉजिंगतुर्भे अपोलो गेस्ट हाऊस तुर्भे