शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 06:01 IST

‘युज अँड थ्रो पार्टी’ असल्याचा आरोप, राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला असल्याचे त्यांनी  सांगितले.

नवी मुंबई - उद्धवसेना म्हणजे ‘युज अँड थ्रो पार्टी’ असून, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत अडकला आहे. तीन हजार कोटी वर्षी खड्ड्यात घातले जात होते. आम्ही आता त्यांचा धंदा बंद केला आहे. आम्ही रस्ते धुतले तर त्यांनी मुंबईची तिजोरी धुतली, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले.

नवी मुंबईमधील उद्धवसेना, काँग्रेस व शरद पवार गटाच्या १३ नगरसेवकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. यावेळी शिंदे बोलत होते. राजा का बेटा राजा नही बनेगा जो मेहनत करेगा वही राजा बनेगा. शिवसेना कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे सर्व जण आपले सवंगडी आहेत. उद्धवसेना सवंगड्यांना घरगडी समजत होते. महापालिकांमध्येही युतीचा भगवा फडकेल. राज्यात सर्वत्र पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत ६५ जणांनी प्रवेश केला असल्याचे त्यांनी  सांगितले.

दहशतवादी हल्ल्याचा निषेधकाश्मीरमध्ये पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह या हल्ल्याला जशास तसे उत्तर देतील. देशवासीयांच्या मनात पाकिस्तानविषयी चीड निर्माण झाली असून, भारतीय जवान चोख उत्तर देतील, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी मांडली.

आम्ही देणारे आहोत... नवी मुंबईमधील माथाडीसह एलआयजी घरांवर कारवाई होऊ दिली जाणार नाही. कंडोनियमअंतर्गत कामांसाठी विशेष निधी दिला जाईल. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणार आहे. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहनही शिंदे यांनी केले. यावेळी आमदार शरद सोनावणे, उपनेते विजय नाहटा, विजय चौगुले, खासदार नरेश म्हस्के, जिल्हाप्रमुख किशोर पाटक, द्वारकानाथ भोईर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना