शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

सिडको विरोधात उलवेवासीय आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 05:06 IST

उलवे परिसराचा विकास अर्धवट सोडून सिडकोने तिथल्या रहिवाशांना वाºयावर सोडले आहे

नवी मुंबई : सिडको विरोधात उलवेवासीयांनी पुकारलेल्या आंदोलनाला विविध संघटनांकडून पाठिंबा वाढत चालला आहे. तसेच आंदोलकांच्या इशाऱ्यामुळे मंगळवारी भरणारा आठवडा बाजारही इतरत्र हलवण्यात आला. मात्र, त्यावर कारवाई न झाल्यामुळे त्यामध्ये सिडको अधिकारी व कर्मचाºयांचे हात ओले होत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.उलवे परिसराचा विकास अर्धवट सोडून सिडकोने तिथल्या रहिवाशांना वाºयावर सोडले आहे. नागरी सुविधांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढत चालले आहे. पदपथदेखील त्यांच्याकडून व्यापले जात असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. मात्र, अनेक तक्रारी करूनही सिडकोने उलवेवासीयांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. तर अनेकदा अनधिकृत फेरीवाल्यांना पाठीशी घालून इतर व्यावसायिकांवर मार्जिनलच्या नावाखाली कारवाया केल्या जात आहेत. त्यामुळे अतिक्रमण विरोधी कारवायांमध्ये अर्थकारण असल्याचा आरोप व्यावसायिकांकडून होत आहे. परिणामी, उलवे परिसरातील रहिवासी व व्यावसायिक यांनी सिडको विरोधात आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. सोमवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, आंदोलनाच्या दुसºया दिवशी विविध संघटनांनी त्यांना पाठिंबा दिला. संजिवनी महिला मंडळासह, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील, मनसे उलवे शहर अध्यक्ष राहुल पाटील, भाजपाचे पंडित म्हात्रे, अमर म्हात्रे, बहाळचे माजी सरपंच बाळाराम पाटील, उपसरपंच रामदास नाईक आदीनी आंदोलकांची भेट घेतली, तसेच समस्या निकाली काढण्यासाठी सिडको विरोधात सुरू असलेल्या लढ्यात सहभाग घेतला.उलवेवासीयांचे हे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच मंगळवारी त्या ठिकाणी आठवडे बाजार भरेल की नाही, यावरून वातावरण तापले होते. या दरम्यान आंदोलकांनी कायदा हातात घेऊ नये, याकरिता पोलिसांनी त्यांना नोटिसादेखील बजावल्या. अखेर आंदोलकांच्या इशाºयामुळे खेळाच्या मैदानात आठवडे बाजार भरला नाही. मात्र, संध्याकाळ होताच त्यापासून काही अंतरावरील दुसºया भूखंडावर हा आठवडे बाजार भरल्याचे पाहायला मिळाल्याचा संताप रहिवासी क्रिशनन पाटील व डॉ. आरती धुमाळ यांनी व्यक्त केला. तर रहिवाशांचा विरोध असतानाही ठिकाण बदलते. मात्र, आठवडे बाजार भरतोच यावरून अनधिकृत फेरीवाल्यांकडून सिडको अधिकाºयांचे हात ओले होत असल्याचाही आरोप त्यांनी केला. जोपर्यंत अनधिकृत फेरीवाल्यांच्या विळख्यातून उलवेवासीयांची सुटका होत नाही व मूलभूत सुविधांमध्ये सुधार होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

टॅग्स :cidcoसिडको