शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे, वाहतूक पोलिसांची १४४७ जणांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 07:02 IST

नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा

नवी मुंबई : नियम धाब्यावर बसवणाºया २४६२ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. या मोहिमेअंतर्गत दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे, तर वाहनांना काळ्या काचा लावणा-यांवरही कारवाईची संख्या मोठी असल्याने काळ्या काचांमागचे गूढ काय हे अद्याप उघड झालेले नाही.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात १६ ते २६ नोव्हेंबर दरम्यान वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबविण्यात आली होती. वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमाचे पालन व्हावे व त्यांना शिस्त लागावी या उद्देशाने ही मोहीम राबवण्यात आली होती. या कालावधीत बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक शाखा उपआयुक्त नितीन पवार यांनी सर्व युनिटच्या अधिकाºयांना दिले होते. त्यानुसार आयुक्तालय क्षेत्रात सर्वच ठिकाणी वाहतूक पोलिसांमार्फत ही मोहीम राबवण्यात आली. यावेळी विना हेल्मेट दुचाकी चालवणाºयांसह फॅन्सी नंबरप्लेट तसेच काळ्या काचा वापरणाºयांवर कारवाई करण्यात आली. यादरम्यान आयुक्तालय कार्यक्षेत्रात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये वाहनांना काळ्या काचा लावल्याप्रकरणी ४३२ जणांवर तर फॅन्सी अथवा अस्पष्ट नंबरप्लेट प्रकरणी ५८३ कारवाया झालेल्या आहेत. तर विना हेल्मेट दुचाकी चालवल्याप्रकरणी तब्बल १४४७ जणांवर कारवाई झाली आहे. त्यावरुन शहरातील दुचाकीस्वारांना हेल्मेटचे वावडे असल्याचे दिसून येत आहे.वाहन चालकांना शिस्त लागावी यासाठी यापूर्वी देखील वाहतूक पोलिसांनी अशा प्रकारे धडक कारवाईची मोहीम राबवलेली आहे. त्यावेळी देखील सर्वाधिक कारवाया हेल्मेट न वापरणाºया दुचाकीस्वारांवर झाल्या होत्या. त्यामध्ये तरुणाईचा सर्वाधिक समावेश असल्याने त्यांना शिस्त लावण्यासाठी महाविद्यालयांच्या बाहेर मोहीम राबवून त्यांना वाहतुकीच्या नियमांबाबत शिस्तीचे धडे देखील देण्यात आले होते. दुचाकीच्या अपघातामध्ये प्राण जाण्याची शक्यता अधिक असल्याने हेल्मेटचे महत्त्व पटवून देण्यात आले होते. परंतु त्यानंतरही बहुतांश दुचाकीस्वारांमधला बेशिस्तपणा कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. तर गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी वाहनांना काळ्या काचा वापरण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. यानंतरही व्हीआयपी थाट म्हणून अनेक जण कारच्या काचांना काळी फिल्म लावतात, परंतु रात्रीच्या वेळी काळ्या काचांमुळे अनेकांचे अपघात देखील झालेले आहेत. त्यानंतरही काळ्या काचांचा मोह कायम असल्याने, अशा वाहनांमध्ये नेमके दडलेय काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.हेल्मेट न वापरल्याने किरकोळ अपघातामध्ये देखील दुचाकीस्वाराचे प्राण गेल्याच्या घटना शहरात घडलेल्या आहेत. ठाणे-बेलापूर मार्गासह पामबीच मार्गावर सर्वाधिक अशा घटना घडल्या आहेत. अशावेळी दुचाकीस्वारांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन केल्यास अपघाताच्या घटना नक्कीच टळतील.वाहन चालकांकडून वाहतुकीच्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. प्रत्येकाने नियम पाळल्यास स्वत:चे व इतरांचे प्राण नक्कीच वाचतील. परंतु अद्यापही अनेक जण वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नसल्याने त्यांच्यावर कारवाईच्या उद्देशाने दहा दिवसांची विशेष कारवाईची मोहीम राबवण्यात आली होती. त्यात एकूण २४६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.- नितीन पवार,पोलीस उपआयुक्त,वाहतूक शाखा

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई