पालघर : मासेमारीसाठी गेलेल्या नौकेमधून वडराई जेटीवर लॅण्डिंग करीत थेट पालघर स्टेशनवरून ट्रेनने मुंबई गाठून मंत्रलयात आरडीएक्सच्या साहाय्याने बॉम्बस्फोट करण्याचा मनसुबा घेऊन आलेल्या दोन अतिरेक्यांना सातपाटी सागरी पोलिसांनी वडराईच्या जेटीवर जेरबंद केले. ही बातमी वा:यासारखी किनारपट्टीवरील गावात पोहोचल्यानंतर एकच खळबळ माजली. परंतु, हे अतिरेकी डमी असल्याचे व सागरी सुरक्षा कवच अभियानाचा तो एक भाग असल्याचे सर्वाना कळल्यानंतर सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.
26/11 च्या घटनेत समुद्रमार्गाने आलेल्या अतिरेक्यांनी मुंबईत घडवलेल्या रक्तपातानंतर सागरी सुरक्षेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. त्यामुळे सागरी मार्गातील सुरक्षा यंत्रणोची तपासणी व त्यातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षी सागरी सुरक्षा कवच अभियान राबविण्यात येते. या वर्षीही पालघर जिल्ह्यातील वसई, पालघर, डहाणू, तलासरी, तालुक्यातील किनारपट्टी भागासह माहीम, टेंभी, सफाळे, नांदगाव, पालघर, उच्छेडी, दांडी येथील कोस्टल चेकपोस्टवर पोलिसी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी संशयास्पद व्यक्ती वहाने यांची कसून तपासणी करण्यात येत होती.
गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासून उपविभागीय पोलीस अधिकारी जयंत बजबळे यांच्या देखरेखीखाली सहायक पो.नि. भुजंग हातमोडेसह पाच अधिकारी, 73 कर्मचारी या सुरक्षा कवच मोहिमेत सहभागी झाले होते. काल संध्याकाळी वडराईच्या किना:यावर एका मच्छीमारी बोटीतून उतरलेले दोन अतिरेकी हे पालघर रेल्वे स्टेशनकडे जाण्याच्या तयारीत असताना पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर मुसळे, किरटकर, जाधव यांनी त्यांना अडवले. त्यांच्या सामानाची तपासणी केली असता त्यात आरडीएक्सचा साठा आढळून आला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर आपण रेल्वेने मुंबईत जाऊन मंत्रलय बॉम्बस्फोटाने उडविणारे असल्याची माहिती दिली. पोलिसांनी दोन अतिरेकी पकडल्याची माहिती वा:यासारखी सर्वत्र पसरल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली.
परंतु, हे अतिरेकी डमी असून नेव्ही आणि कोस्टगार्डचे क र्मचारी असलेल्या या दोघांना भर समुद्रात मच्छीमारी बोटीतून पाठवले जाते. त्यांना पकडण्याचे चॅलेंज पोलीस आणि इतर सुरक्षा यंत्रणोला असते. या परीक्षेत मात्र सातपाटी सागरी पोलीस यशस्वी झाल्याचे कालच्या घटनेतून निदर्शनास आले आहे. (वार्ताहर)
बोईसर : समुद्रकिनारी असलेली सुरक्षा किती सक्षम आहे, याचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या सागरी सुरक्षा कवच अभियानात पालघर जिल्हा पोलिसांनी रेड फोर्सची बोट तारापूर अणुऊर्जा केंद्रासमोरील खोल समुद्रात पकडून मोहीम फत्ते करून तारापूर अणुऊर्जा केंद्राची सुरक्षा अबाधित असल्याचे दाखूवन दिले. कोस्टगार्ड, इंडियन नेव्ही व पालघर जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा कवच अभियान काल (दि. 13) व आज असे सलग दोन दिवस आयोजित केले होते. त्या वेळी रेड फोर्सच्या जवानांनी बोटीतून तारापूर, अणुशक्ती केंद्राकडे येण्याचा प्रयत्न करताच तारापूर पोलिसांनी रेड फोर्सची बोट समुद्रातच पकडून त्यांचे प्रय} हाणून पाडले.
सागरी सुरक्षा कवच काय असते?
कोस्टगार्ड, इंडियन नेव्ही व जिल्हा पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सुरक्षा कवच अभियानाचे आयोजन होते. त्यामध्ये कोस्टगार्डचे जवान रेड फोर्सच्या माध्यमाने समुद्रामार्गे घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना शोधून हुसकावण्याचे आणि त्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याचे काम जिल्हा पोलीस दलाचे ब्ल्यू फोर्स म्हणजे बचावाचे काम करीत असतात, तर रेड फोर्स घुसखोरी करण्यात यशस्वी झाले म्हणजे समुद्रकिना:यावरील सुरक्षा भेदली जाते, असे समजण्यात येते.