शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वेच्या मार्गांवर दाेन दिवस मेगाब्लॉक; सात गाड्यांच्या वेळापत्रकांमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 10:27 IST

मडगाव-कुमठा विभागात दुरुस्तीचे काम हाेणार असल्याने दोन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे.

नवी मुंबई : कोकण रेल्वेच्या दोन मार्गांवरील मडगाव - कुमठा आणि राजापूर रोड ते सिंधुदुर्ग या विभागात १६ आणि १७ नोव्हेंबर असे दोन दिवस अनुक्रमे तीन आणि अडीच तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे गाड्यांच्या वेळापत्रकात अंशत: बदल केला आहे. मडगाव-कुमठा विभागात दुरुस्तीचे काम हाेणार असल्याने दोन गाड्यांचे वेळापत्रक प्रभावित होणार आहे.

मंगळुरू सेंट्रल-मडगाव जंक्शन या गाडीचा प्रवास १६ नोव्हेंबर रोजी  कुमठा स्थानकावर थांबेल आणि कुमठा ते मडगाव विभागादरम्यान अंशत: रद्द होईल. मडगाव जंक्शन-मंगळुरू सेंट्रल या गाडीचा १६ नोव्हेंबर रोजीचा प्रवास कुमठा स्थानकातून नियोजित वेळेत सुरू होईल. परंतु, मडगाव-कुमठा विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, असे कोकण रेल्वेने कळविले आहे. 

तीन गाड्यांच्या वेळेचे नियमन

राजापूर रोड-सिंधुदुर्ग विभागादरम्यान  मडगाव जंक्शन-सावंतवाडी रोड आणि सावंतवाडी रोड-दिवा एक्स्प्रेस या दोन गाड्यांचे वेळापत्रक पुनरर्चित केले आहे. या गाड्या अनुक्रमे  ८० मिनिटे,  २ तास ५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. मुंबई सीएसएमटी (१२०५१)  या जनशताब्दी एक्स्प्रेसचा प्रवास  रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २०  मिनिटांसाठी नियमित केला जाईल. मुंबई सीएसएमटी-मडगाव जंक्शन (२२११९) या तेजस एक्स्प्रेसचा प्रवास रत्नागिरी आणि राजापूर रोडदरम्यान २० मिनिटांसाठी रोखून धरला जाईल. 

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वे