शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा

By नारायण जाधव | Updated: May 31, 2025 07:36 IST

वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ

नारायण जाधव

नवी मुंबई : राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासह प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेत वाढ करण्यासाठी राज्य शासनाने आपल्या विविध विभागांच्या मालकीची २१,४२५ वाहने भंगारात काढली आहेत. यातील १२,८२३ वाहने १ एप्रिल २०२४ ते २१ एप्रिल २०२५ या काळात भंगारात काढली आहेत. उर्वरित ७,८७९ ही १ एप्रिल २०२४ पूर्वी भंगारात काढल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच, नव्याने ९४६ वाहने विभागाच्या पोर्टलवर भंगारासाठी लिलावात काढली.

केंद्र सरकारच्या मोटार वाहन (निष्कासन व नोंदणी) नियम २०२१ अनुसार ही वाहने निष्कासित केल्याची माहिती परितटन विभागाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या १०० दिवस कृती आराखडा कार्यक्रमात दिली. भविष्यात वाहनांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. जुनी वाहने भंगारात काढल्यानंतर नवी वाहने खरेदी करण्याची मुभा दिल्याने अर्थव्यवस्थेत चालना मिळेल, असे शासनाने म्हटले आहे.

जुनी वाहने भंगारात का? 

राज्यातील वाहनांचे प्रदूषण कमी करणे. 

रस्त्यावरील प्रवासी, तसेच वाहनांच्या सुरक्षिततेमध्ये वाढ करणे. 

वाहनांची इंधन कार्यक्षमतेत सुधारणा करून देखभाल खर्च कमी करणे.

जुन्या वाहनांच्या बदल्यात नवीन वाहने वापरात आणून अर्थव्यवस्थेत गुणात्मक सुधारणा करणे.

खरेदी करण्यासाठी मुभा 

१५ वर्षे किंवा त्याहून जुनी जी शासकीय वाहने भंगारात काढून त्यांचा लिलाव केला आहे, त्यामुळे त्यांच्याअभावी अधिकाऱ्यांची गैरसोय होऊ नये, शासकीय कामे खोळंबू नये, हे लक्षात घेऊन या वाहनांच्या जागी भाड्याने घेण्याची वा नवी वाहने खरेदी करण्याची मुभा संबंधितांना दिली आहे.

कोणाची किती वाहने ?

केंद्र शासन १,१४६ 

राज्य शासन ५,२११ 

पोलिस ६,४६६

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारcarकार