शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
मोदी सरकार देतंय ₹५ लाख लिमिट असलेलं क्रेडिट कार्ड; कसा मिळेल फायदा, जाणून घ्या
4
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
5
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
6
POK नाही तर 'लाहोर'वरही भारताचा ताबा होता; UNSC च्या मध्यस्थीनं कसा वाचला पाकिस्तान?
7
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
8
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
9
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
10
शाब्बास पोरी! ३ वेळा नापास होऊनही मानली नाही हार, मजुराची लेक झाली IAS अधिकारी
11
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
12
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
13
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
14
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
15
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
16
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
17
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाही तर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
18
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
19
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
20
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."

जनजागृतीसाठी साकारला ‘कचरासुर’; नवी मुंबई महापालिकेचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 01:10 IST

चित्ररथावर प्रतिकृती; एलईडी स्क्रीनचाही समावेश

नवी मुंबई : स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये जनसहभाग वाढविण्यासाठी महापालिकेने चित्ररथाच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे. या रथावर कचरासुराची प्रतिकृती बसविण्यात येणार आहे. चेंडू मारून कचरासुराचा नाश करण्याची स्पर्धा ठेवली जाणार असून विजेत्यांना बक्षीसही देण्यात येणार आहे.स्वच्छ सर्वेक्षणाच्या पहिल्या दोन तिमाहीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचा देशात तिसरा क्रमांक आला आहे. हा क्रमांक टिकविण्यासाठी महापालिका प्रशासन व लोकप्रतिनिधींनी जय्यत तयारी सुरू केली आहे. अभियानामधील जनसहभाग वाढविण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे. याचाच भाग म्हणून चित्ररथ तयार करण्यात आला आहे.रथावर कचरासुराची प्रतिकृती ठेवण्यात येणार आहे. त्याला चेंडू मारल्यावर तो निश्चित ठिकाणी लागल्यास कचरासुराचा नाश केल्याबद्दल बक्षीस दिले जाणार आहे. खेळाच्या व मनोरंजनाच्या माध्यमातून कचरामुक्तीचा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. या रथावर एल.ई.डी. स्क्रीनद्वारे कचरा निर्मूलनाविषयी जनजागृतीपर संगीतमय क्लीप्स प्रसारित केल्या जाणार आहेत. आकाशी निळ्या रंगात सजविजेले हे वाहन लक्षवेधी असून, त्यावर ओला कचरा, सुका कचरा व घरगुती घातक कचरा यांचे प्रतिकात्मक डबेही नागरिकांच्या माहितीसाठी प्रदर्शित करण्यात आले आहेत. चित्ररथाच्या शुभारंभप्रसंगी आरंभ क्रिएशन या संस्थेने एक पाऊल स्वच्छतेकडे या विषयावर मिलिंद खानविलकर लिखित व दिग्दर्शित मनोरंजन व प्रबोधनात्मक पथनाट्य सादर केले. शहरातील चौकाचौकांत व गल्ल्यांमध्ये स्वच्छतेचा संदेश प्रसारित करण्यात येणार आहे.महापौर जयवंत सुतार यांनी स्वच्छतारथाच्या माध्यमातून नवी मुंबईच्या सर्व भागात स्वच्छता संदेश प्रसारित करण्यात येणार आहे. नागरिकांनी या अभियानामध्ये सहभागी होऊन या स्पर्धेतील मानांकन वाचविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनीही स्वच्छता अभियानामध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या वेळी उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, सुधाकर सोनावणे, अनंत सुतार, अनिता मानवतकर, अतिरिक्त आयुक्त रवींद्र पाटील, उपायुक्त तुषार पवार, डॉ. बाळासाहेब सोनावणे व इतर मान्यवर उपस्थित होते.टाकाऊ वस्तूंपासून शिल्पाकृतीघनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त तुषार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा एकदा ई-कचरा यापासून स्वच्छ सर्वेक्षण २०२० ही कलात्मक शिल्पाकृती ११० संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्डपासून आठ दिवसांत बनवली आहे. १५ फूट लांब आणि सात फूट उंचीची ही वर्तुळाकार शिल्पाकृती २०० किलो वजनाची आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत शून्य कचरा ही संकल्पना प्रत्यक्षात आणत पर्यावरणशील स्मार्ट कलात्मक शहर ही नवी मुंबईची ओळख या शिल्पामधून निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यापूर्वीही टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवित ग्रीन सोसायटी फोरमने महापालिका मुख्यालयात आणि स्वच्छता पार्क कोपरखैरणे येथे संगणकाच्या टाकाऊ मदरबोर्डपासून भारत देशाच्या नकाशाची शिल्पाकृती साकारली होती. ज्याला मदर इंडिया बोर्ड असे आकर्षक नाव देण्यात आले होते. त्याचेच पुढचे पाऊल टाकत कलात्मक विचारांच्या या समूहाने नागरिकांनी टाकून दिलेल्या रिकाम्या प्लास्टिक बाटल्यांची सात हजार झाकणे पाच दिवस शहरभर फिरून जमा केली व त्यामधून दहा दिवसांत ‘फिफा’ स्पर्धेच्या ‘रिसायकलेडेलिक फिफा म्युरल’ हे अभिनव शिल्प महापालिका मुख्यालयासमोर साकारले होते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका