Transfers of CIDCO officials | सिडकोत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे
सिडकोत अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे वारे

नवी मुंबई : एकाच विभागात वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या तसेच विविध स्वरूपाच्या तक्रारी असलेल्या सिडकोतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विभागांतर्गत बदल्या करण्याचा निर्णय सिडको व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात विविध विभागातील सुमारे १५ अधिकाऱ्यांच्या पुढील काही दिवसांत बदल्या केल्या जाणार असल्याचे समजते.

राज्यातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. नवीन शहरांची निर्मिती हा प्रमुख हेतू असलेल्या सिडकोने मागील ४० वर्षांत विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प उभारले आहेत. सध्या सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व मेट्रो या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सुरू आहे.

सिडकोचा संपूर्ण कारभार जवळपास १५ विभागांच्या माध्यमातून चालतो. यात प्रामुख्याने लेखा व वित्त विभाग, वास्तुशास्त्र, अनधिकृत बांधकाम नियंत्रक विभाग, अभियांत्रिकी, सामान्य प्रशासन, पणन, कार्मिक, नियोजन विभाग, सार्वजनिक आरोग्य सेवा, पुनर्वसन, सामाजिक सेवा विभाग, शहर सेवा विभाग, भूमी व भूमापन विभाग आदीचा समावेश आहे. यातील बहुतांशी विभागातील वरिष्ठ अधिकाºयांचा मागील अनेक वर्षे खांदेपालट झालेला नाही. पूर्ण झाल्यानंतर नियमानुसार इतर विभागात संबंधित अधिकाºयांची बदली करणे आवश्यक आहे.


Web Title: Transfers of CIDCO officials
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.