पनवेल: दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे गावी गेलेले प्रवासी रविवारी परतल्याने सायन-पनवेल महामार्गावर वाहनांच्या रविवारी सायंकाळी ६च्या सुमारास लांबच लाब रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. खारघर येथून कळंबोलीपर्यंत ही वाहतूक कोंडी झाली होती.अचानक सुट्टीवरून परतल्याने ही समस्या उद्भवली होती. कोपरा उड्डाणपुलाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी अधिकच वाढली. कळंबोलीपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने खारघर गाठण्यासाठी तासाचा अवधी लागत होता.
सुट्टीवरून परतणाऱ्या वाहनांमुळे सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक कोंडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 18:52 IST