शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी कायम 

By वैभव गायकर | Updated: June 9, 2024 16:51 IST

        खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे.

पनवेल,नवी मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात खारघर शहरामधील नैसर्गिक पांडवकडा धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. मुंबई, उपनगर, ते कल्याण, ठाणे तसेच रायगड जिल्ह्यातील पर्यटकांच्या पसंतीस उतरलेल्या या धबधब्यावर सुरक्षेच्या कारणावरून यंदाही वन खात्याने बंदी घातल्याने पर्यटकांचा हिरमोड होणार आहे.

        खारघरमधील पांडवकडा धबधब्यावर दरवर्षी हजारो पर्यटक येतात. मात्र अतिउत्साहाच्या भरात किंवा हलगर्जीपणामुळे अनेक वेळा याठिकाणी अपघात घडले आहेत आणि अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळेच वनखात्याने याठिकाणी पर्यटकांना येण्यास मज्जाव केला आहे.

यंदाही पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. वनविभागाच्या या निर्णयावर अनेक पर्यावरणप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. पांडवकडा धबधबा हा नवी मुंबईमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू असताना त्याठिकाणी प्रवेश नाकारणे हे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. पांडवकडा धबधब्याला पर्यटन क्षेत्राचा दर्जा अद्याप मिळालेला नाही.वनविभागाने पर्यटकांसाठी प्रवेश बंद केल्यानेच याठिकाणच्या पर्यटन क्षेत्राला चालना कशी मिळणार असा प्रश्न यावेळी उपस्थित होत आहे .

     पर्यटकांच्या जीव धोक्यात जाऊ नये म्हणून आम्ही हे पाऊल उचलले आहे.पर्यटकांनी नियमांचे उल्लंघन करू नये. याठिकाणी बंदोबस्तासाठी पोलिसांना देखील पत्र लिहणार असल्याची माहिती वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी देविदास सोनावणे यांनी सांगितले.

याठिकाणीही बंदी -गाढ़ेश्वर डॅम,गाढी नदी पात्राजवळील धबधबे याठिकाणी बंदी असणार आहे.दरवर्षी या ठिकाणांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो.

कर्नाळा अभयारण्यात करता येणार निसर्ग पर्यटन -शहरातील महत्वाची ठिकाणी पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बंदी घातली गेली असली तरी कर्नाळा अभयारण्यासारख्या प्रसिद्ध पर्यटनस्थळी पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा लाभ घेता येणार आहे. 

टॅग्स :panvelपनवेलtourismपर्यटनRainपाऊस