लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेलच्या करंजाडे भागात अँॅक्टिंग क्लासेस चालविणार्या एका व्यक्तीने मराठी सिरियलमध्ये, तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. राजू उर्फ प्रेम सोनुने असे या व्यक्तीचे नाव असून, पनवेल शहर पोलिसांनी त्याच्यावर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणात राजूची पत्नी व अन्य एक महिलाही सहभागी असल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी या दोघींनाही सहआरोपी केले आहे. राजू उर्फ प्रेम सोनुने हा पनवेल तालुक्यातील करंजाडे भागात राहत असून, पायाने अपंग आहे. आपल्या राहत्या घरामध्येच त्याने अँॅक्टिंगचे क्लासेस सुरू केले होते. या कामामध्ये त्याची पत्नी अस्मिता व श्री नावाची महिला त्याला मदत करत होत्या. क्लासमध्ये अँक्टिंग शिकण्यासाठी येणार्या तरुणींना मराठी सिरियलमध्ये, तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून तो पैसे उकळत होता. एप्रिल २0१७ मध्ये सोनुने याने अँक्टिंग शिकायला येणार्या १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. पीडित तरुणीने या ठिकाणी येणार्या अन्य दोन तरुणींशी याबाबत संवाद साधला असता, त्यांच्यावरही त्याने लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले. अखेर तीनही तरुणींनी पनवेल शहर पोलीस ठाणे गाठून सोनुने विरोधात तक्र ार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी सोनुनेवर बलात्कारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अँक्टिंग शिकवण्याच्या बहाण्याने अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:03 IST
पनवेलच्या करंजाडे भागात अँॅक्टिंग क्लासेस चालविणार्या एका व्यक्तीने मराठी सिरियलमध्ये, तसेच शॉर्ट फिल्ममध्ये काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन तरुणींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
अँक्टिंग शिकवण्याच्या बहाण्याने अत्याचार
ठळक मुद्देआरोपीस अटक तीन तरुणींना दाखवले सिरियलमध्ये काम देण्याचे आमिष