शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याच्या टमाट्याचा भाव वधारला, किलोला 100 रुपये ऐकून ग्राहक अवाक् झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 12:08 IST

उत्पादन घटल्याने भाव वाढले

नामदेव मोरे

नवी मुंबई : देशभर टोमॅटोचे उत्पादन घटल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोचे दर ४० ते ८० रुपयांवर पोहोचले असून, किरकोळ मार्केटमध्येही भाव ९० ते १०० रुपये झाले आहेत. दक्षिणेतील राज्यांनाही महाराष्ट्रातून टोमॅटो पुरविला जात आहे.          

मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये नियमितपणे सर्वाधिक मागणी असलेल्या भाज्यांमध्ये टोमॅटोचाही समावेश हाेतो. मुंबईकरांच्या आवडीची पावभाजी, सॅलॅड व सर्वसामान्य नागरिकांच्या आहारातही टोमॅटोची भाजी नियमित केली जाते. त्यामुळे वर्षभर टोमॅटोची मोठ्या प्रमाणात मागणी असते. मुंबईत सातारा, पुणे, नाशिकसह दक्षिणेतील राज्यांमधूनही टोमॅटोची आवक होत असते; परंतु पंधरा दिवसांपासून कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडूमध्ये टोमॅटोची कमतरता निर्माण झाली आहे. तेथेही महाराष्ट्रातून टोमॅटो पाठविला जात आहे. मागणीच्या तुलनेत उत्पादन कमी होत असल्यामुळे बाजारभाव वाढू लागले आहेत.     मुंबई बाजार समितीमध्ये एक महिन्यापूर्वी १४ ते २२ रुपये किलो दराने टाेमॅटो विकला जात होता. एक आठवड्यापूर्वी हे दर २५ ते ६० रुपये झाले व सोमवारी बाजारभाव ४० ते ८० रुपयांवर गेले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये ९० ते १०० रुपये दराने टोमॅटोची विक्री हाेत असून, त्यामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई