शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

खारघरमधील तोडेकर दाम्पत्य सुखरूप परतले; आकाशात झेपावणाऱ्या मिसाईल स्वतः पाहिल्याचा दावा

By वैभव गायकर | Updated: March 4, 2026 17:47 IST

नवी मुंबईच्या खारघरमधील तोडेकर दाम्पत्य दुबईमध्ये अडकले होते

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: ईराण-अमेरिका इस्त्रायल युद्धामुळे जागतिक स्तरावर त्याचे परिणाम भोगावे लागले आहेत. हजारो भारतीयांना या युद्धाचा फटका बसला. विशेष म्हणजे पर्यटनासाठी गेलेले पर्यटक याठिकाणी अडकून बसले आहेत. खारघर गावातील सिद्धार्थ तोडेकर आणि त्यांच्या पत्नी रिंकल तोडेकर हे दाम्पत्यदेखील २५ फेब्रुवारीला दुबईमध्ये पर्यटनासाठी गेले होते. मात्र अवघ्या तीन दिवसांत निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थितीमुळे या दाम्पत्याला मोठ्या प्रमाणात मानसिक तणावाला सामोरे जावे लागले. परतीचा प्रवास अनेकवेळा रद्द झाल्याने ४ तारखेला पहाटे ४.३० वाजता दोघेही सुखरूप मुंबईला पोहचल्याने दोघांनी सुटकेचा निश्वास सोडला.

सिद्धार्थ तोडेकर (२९) आणि रिंकल तोडेकर (२७) हे नवविवाहित दाम्पत्य दुबईमध्ये पर्यटनाला गेले होते. स्वतःच या दौऱ्याचे त्यांनी नियोजन केले होते. दुबईमधील प्रसिद्ध अल बरशा येथील नोवाटेल हॉटेलमध्ये ते थांबले होते. तिसऱ्या दिवशी २८ फेब्रुवारीला दुबईमधील ख्यातनाम मिरॅकल गार्डन याठिकाणी फिरताना त्यांना अचानक जोरात रॉकेटचा आवाज आला. "आमच्या डोक्याच्यावरून आकाशात भल्या मोठ्या रॉकेटचा मारा झाल्याच्या आम्ही पाहिले. मात्र येथील रडार यंत्रणेने ती मिसाईल त्वरित निकामी केली. साधारणतः दुपारी ३ च्या सुमारास ही घटना होती. या घटनेनंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले. येथील पर्यटकांना युद्धाचा कोणताही त्रास झाला नाही. कोणीही जखमी झाले नाही. पण रात्री मोठ्या प्रमाणात मिसाईलचा मारा करण्यात आला. उशिरापर्यंत हे आवाज कानी पडत होते आणि सकाळीही मिसाईलचे आवाज सुरुच होते," असे सिद्धार्थ तोडेकर यांनी सांगितले.

२ तारखेचा परतीचा प्रवास असल्याने तोडेकर दाम्पत्य विमानतळावर जाण्यास निघाले. मात्र एअरस्पेस बंद झाल्याने त्यांची तिकिटे रद्द झाली.पुन्हा दि.3 रोजी त्यांची तिकिटे रिशेडयूल्ड करण्यात आली.मात्र तीन उड्डाणे पुन्हा रद्द झाली.यावेळी अमिरात एअरलाईन्सची रात्री १०.३० ची फ्लाईट त्यांना मिळाली.यावेळी पुन्हा आकाशात काही मिसाईल दिसत होत्या.पायलटने दुबई मध्येच थेट उड्डाण न घेता कमी उंचीवरून विमान उडवले आणि सुरक्षित एअर स्पेस मधून विमान उडवले.कालांतराने परिस्थिती नियंत्रणात आली.आम्ही ४ तारखेला पहाटे ४.३० वाजता मुंबईला पोहचलो, असे सिद्धार्थ यांनी सांगितले.

चार फ्लाईट रद्द

२ मार्चचे विमान रद्द झाल्याने ३ तारखेला सकाळीच नव्याने बुकिंग करून दुबई विमानतळ गाठले. यावेळी दुपारी दीड वाजताची हैदराबाद फ्लाईट रद्द झाली. त्यानंतर बंगलोरची फ्लाईट रद्द झाली. पुन्हा रात्री ९.३०च्या फ्लाईटचे तिकीट मिळाले. यावेळी बोर्डिंगसाठी गेट जवळ गेल्यावर विमानतळानजीक मिसाईल पाहिली गेल्याने ती फ्लाईटदेखील रद्द झाली. शेवटी रात्री १०.१५ मिनिटांनी एअर अमिरातने उड्डाण घेतला. पहाटे ४.३० वाजता तोडेकर दाम्पत्य सुखरूप मुंबईला पोहोचले.

आम्ही स्वतःच दुबईचे प्लॅनिंग करून फिरायला गेलो होतो.युद्धजन्य परिस्थितीत अनेक वेळा फ्लाईट्स रद्द झाल्या.दुबईची रडार यंत्रणा अतिशय उत्तम असल्याने थेट जमिनीवर कोणतीही मिसाईल पडली नाही.ठरल्या प्रमाणे आम्हाला या स्थितीमुळे फिरता आले नाही.तसेच वारंवार फ्लाईटस रद्द होत होत्या.ऑनलाईन एअर लाईन्स मार्फत आम्हाला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.यामुळे काही प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागला.-सिद्धार्थ सुधाकर तोडेकर, खारघर गाव

English
हिंदी सारांश
Web Title : Khargar couple safely returns from Dubai, witnessed missile attacks.

Web Summary : Khargar couple, stranded in Dubai due to Iran-Israel conflict, returned safely. They witnessed missile attacks, facing flight cancellations and anxiety before finally reaching Mumbai.
टॅग्स :warयुद्धIsraelइस्रायलDubaiदुबई