शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्काराची आज रंगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:39 IST

उल्लेखनीय नेतृत्व, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : उल्लेखनीय नेतृत्व, सामाजिक आणि शैक्षणिक कार्याचा सन्मान करण्याच्या उद्देशाने विजय नाहटा फाउंडेशन पुरस्कृत ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवार, १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यात ५० पेक्षा अधिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे.शिक्षक हे भविष्यातील पिढी घडविण्याचे काम करत असतात. अशा शिक्षकांना ‘लोकमत’च्या माध्यमातून आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे नवी मुंबईतील यंदाचे पहिलेच वर्ष आहे. शहरातील शाळांशी संपर्क साधून शाळेच्या कमिटीमार्फत सुचविलेल्या शिक्षकांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेऊन ‘लोकमत आदर्श शिक्षक’ पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.या शिक्षकांना प्रशस्तिपत्रक तसेच सन्मानचिन्ह देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विजय नाहटा फाउंडेशनचे संस्थापक विजय नाहटा, कार्याध्यक्ष विठ्ठल मोरे, दिल्ली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक जे. मोहंती, व्ही. टू. सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक राज जी. ठक्कर, रोनक अ‍ॅडर्व्हटायझिंगचे संचालक अमरदीप सिंग व्हिग, अभिनेता विजय पाटकर, अभिनेता जयवंत वाडकर व एस. के. बिल्डर्सचे संचालक डॉ. संजीव कुमार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्र मासाठी प्रवेश मोफत असणार असल्याने नागरिकांनी या कार्यक्र माला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकLokmatलोकमतNavi Mumbaiनवी मुंबई