शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

'शिंदे साहेब विनंती आहे' असे म्हणत आत्महत्या; सावकाराच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 12:26 IST

कुटुंबीय गावावरून परत आल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: सावकाराच्या चक्रवाढ व्याजाला कंटाळून एकाने आत्महत्या केल्याची घटना कोपरखैरणे येथे समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत या व्यक्तीने ‘प्लीज, एकनाथ शिंदे साहेब तुमच्याकडे विनंती आहे,’ असे लिहीत या प्रकरणात दोषी सावकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

आत्महत्या करणाऱ्याचे नाव रवींद्र शिंदे (वय ३९) असे कोपरखैरणे सेक्टर १९ परिसरातील राहत्या इमारतीच्या छतावर गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. सकाळी या घटनेची नोंद केल्यानंतर त्यांचा मृतदेह गावी नेण्यात आला होता. कुटुंबीय गावावरून परत आल्यानंतर त्यांनी सोमवारी पोलिसांकडे याबाबत तक्रार केली.

कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

  • पोलिसांनी प्रथमेश चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. वाहन चालक म्हणून काम करणाऱ्या रवींद्र शिंदे यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. 
  • त्यामुळे त्यांनी सांताक्रुझ येथील प्रथमेश चव्हाण याच्याकडून काही रक्कम १२.५ टक्के व्याजाने घेतली होती. मात्र, पैसे दिल्यानंतर चव्हाण हा ३० टक्के व्याज आकारत होता, असे समोर आले. 
  • या चक्रवाढ व्याजाला आणि त्याच्या त्रासाला कंटाळून रवींद्र यांनी आत्महत्या केल्याचे चिठ्ठीतून समोर आले आहे.  या प्रकरणी कोपरखैरणे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • याच्या चौकशीतून सावकारी कर्जाची आणखी प्रकरणं उघडकीस येण्याची शक्यता आहे.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे