शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

२७ वर्षांपूर्वीची जलवाहिनी बदलण्याच्या कामाला मुहूर्त; खाडीची जल प्रदूषणापासून होणार सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 09:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ठाणे -बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त सांड पाणी वाशी खाडीत ...

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्यातील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणारे प्रक्रियायुक्त सांडपाणी वाशी खाडीत सोडण्यासाठी एमआयडीसीने टाकलेली २७ वर्षांपूर्वीची जलवाहिनी जीर्ण झाल्याने खाडीत प्रदूषण पसरत आहे. यामुळे राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सूचनेनुसार जलवाहिनी बदलण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. एमआयडीसीच्या या प्रस्तावास सीआरझेड प्राधिकरणाने आपल्या १८० व्या बैठकीत मंजुरी दिली आहे. यामुळे वाशी खाडीतील प्रदूषण थांबण्यास मदत होणार आहे.

ठाणे-बेलापूर औद्योगिक पट्ट्याचे क्षेत्र २५६० हेक्टर असून, येथील रासायनिक कंपन्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनयुक्त सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी एमआयडीसीने पावणे येथे राष्ट्रीय जल आणि ऊर्जा संशोधन केंद्र व राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या सूचनेनुसार १९९८ साली ३.६ किमीची पाइपलाइन टाकली होती. 

मात्र, आता ती जीर्ण झाल्याने लीकेज होऊन समुद्री वनस्पती आणि जलचरांसाठी घातक ठरत आहे. त्यामुळेच ती नव्याने टाकण्याचा निर्णय एमआयडीसीने घेतला आहे. यात बाधित होणाऱ्या ९८.१० मीटर क्षेत्रातील खारफुटीची कत्तल करावी लागणार असून, भरपाई म्हणून तिची इतरत्र लागवड करावी लागणार आहे.

मच्छीमार, जलचरांना मिळणार दिलासा

एमआयडीसीने ही नवी सांडपाणी वाहिनी टाकल्यानंतर सध्याच्या जुन्या वाहिनीतून होणाऱ्या लीकेजमुळे होणारे रसायनांचे प्रदूषण पूर्णपणे थांबणार आहे. यामुळे समुद्री पर्यावरणाचा ऱ्हास थांबून मासळी उत्पादन वाढून मच्छीमारांना दिलासा मिळणार आहे. याशिवाय खारफुटींसह इतर समुद्री वनस्पतींनाही लाभ होणार आहे. तसेच ठाणे-वाशी खाडीच्या परिसरातील रहिवाशांनाही मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.

अशी असेल वाहिनी

  • एकूण लांबी - ३.६ किमी
  • पाण्याच्या पातळीपासूनच जलवाहिनीची खोली - ५.५ मीटर
  • रुंदी - ६.४ मीटर
टॅग्स :Waterपाणीwater pollutionजल प्रदूषणthaneठाणेNavi Mumbaiनवी मुंबई