शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
रशियाचा युक्रेनवर मोठा हल्ला, रुग्णालय आणि वीज प्रकल्पाचे मोठे नुकसान; सात जण जखमी
3
अग्नितांडव! बांगलादेशच्या ढाकामध्ये कपड्याच्या फॅक्ट्रीला भीषण आग; १६ कामगारांचा होरपळून मृत्यू
4
आजचे राशीभविष्य, १५ ऑक्टोबर २०२५: सरकारी कामात यश, हाती पैसा येईल; चांगली बातमी मिळेल
5
ना शिधा, ना आनंद! भुजबळांनी ते धाडस दाखविले...
6
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
7
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
8
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
9
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
10
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
11
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
12
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
13
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
14
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
15
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
16
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
17
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
18
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
19
कवितेच्या सूर्यकुळाचे नायक तुम्हीच आहात, सुर्वे !
20
महाराष्ट्र उच्च शिक्षणाचे जागतिक केंद्र कसे बनेल?

नवी मुंबईत फुटबॉलचा थरार, ९४ संघ १५०० खेळाडूंचा सहभाग; सलामीच्या सामन्यात ॲव्हालोन हाईट्स शाळेचा विजय

By नामदेव मोरे | Updated: June 27, 2024 18:54 IST

नवी मुंबईमध्ये फिफा १७ वर्षाखालील महिला फुटबॉलचे सामने व इतर अंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने झाल्यापासून फुटबॉलविषयी ची आवड वाढू लागली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईत सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये ९४ संघांनी सहभाग घेतला असून १५०० खेळाडूंचे कसब पणाला लागणार आहे. सलामीच्या सामन्यात वाशीतील ॲव्हालोन हाईट्स शाळेने सेंट मेरी संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली.              नवी मुंबईमध्ये फिफा १७ वर्षाखालील महिला फुटबॉलचे सामने व इतर अंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने झाल्यापासून फुटबॉलविषयी ची आवड वाढू लागली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने नेरूळ सेक्टर १९ मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल क्रीडांगण तयार केले आहे. वाशीमध्ये फादर ॲग्नेल संस्थेनेही अंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान व प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शहरातील अनेक शाळांनीही फुटबॉल संघ तयार करण्यास प्राधान्य दिले आहे. जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व महानगरपालिकेच्यावतीने २८ जुनपासून जिल्हास्तरीय सुब्रतो मुखर्जी जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. नेरूळमधील महानगरपालिकेच्या मैदानात या स्पर्धेला शुभारंभ झाला. सलामीचा सामना ॲव्हालोन हाईट्स व सेंट मेरी यांच्यामध्ये झाला. ४ - २ अशा फरकाने ॲव्हालोन हाईट्स शाळेने हा सामाना जिंकला.              यावर्षी १५ वर्ष वयोगटात ३६ संघ सहभागी झाले आहेत. १७ वर्षाआतील मुलांचे ३६ व मुलींचे २२ संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेमध्ये एकूण ९४ संघांचा सहभाग असून १५०० पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. ऐन पावसाळ्यात या खेळाडूंचा विजेतेपदासाठी कस लागणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, क्रीडा उपायुक्त अभिलाषा म्हात्रे, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, मनपा क्रीडा नियोजन समीतीचे सदस्य धनंजय वनमानी व इतर मान्यवर उपस्थित होते. 

टॅग्स :FootballफुटबॉलNavi Mumbaiनवी मुंबई