शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

तीन हजार सुरक्षारक्षकांचा पहारा, शासकीय आणि निमशासकीय विभागात कार्यरत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:35 IST

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहे. पोलिसांची वाहने चौकाचौकात गस्त घालताना दिसत आहेत. या सर्वांत खासगी सुरक्षारक्षक काहीसे दुर्लक्षित झाले आहेत.

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : लॉकडाउनच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त दिसत आहे. त्याचबरोबर शासकीय आणि निमशासकीय कार्यालयामध्ये खासगी सुरक्षारक्षकांचाही खडा पहारा सुरू आहे. लॉकडाउनमुळे इतर सेवा बंद आहेत. परंतु आरोग्य विभाग तसेच शासकीय, निमशासकीय कार्यालयांत ३ हजारांपेक्षा जास्त सुरक्षारक्षक १२ तासांची सेवा देत प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डॉक्टर, शासकीय अधिकारी, पोलीस यंत्रणा दिवस-रात्र आपले कर्तव्य बजावत आहे. पोलिसांची वाहने चौकाचौकात गस्त घालताना दिसत आहेत. या सर्वांत खासगी सुरक्षारक्षक काहीसे दुर्लक्षित झाले आहेत.रायगड जिल्ह्याचा विचार करता, ३१७८ सुरक्षारक्षक सध्या दिवसरात्र सेवा बजावत आहेत. शासनाच्या माध्यमातून रायगड जिल्हा सुरक्षारक्षक मंडळ कार्यरत आहे. या मंडळांतर्गत १५३९ सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. तर खासगी सुरक्षा सेवा पुरवणाऱ्या जवळपास २२ सिक्युरिटी एजन्सी आहेत. त्यांच्या अंतर्गत १६३९ खासगी सुरक्षारक्षक कार्यरत आहेत. यात पनवेल महापालिका क्षेत्रात मंडळाचे ७०० सुरक्षारक्षक काम करतात. तर ९०० खासगी सुरक्षारक्षक काम करतात. सुरक्षारक्षक मंडळाच्या वतीने मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोव्ह्ज दिल्याचे बोर्डाचे अधिकारी एम.एच. पवार यांनी सांगितले.।सुरक्षारक्षकांची विनातक्रार सेवादररोज किमान १२ तासांची ड्युटी करणाºया सुरक्षारक्षकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. तुटपुंजा पगार तोही वेळेवर होत नाही. तर सुरक्षेच्या दृष्टीने साहित्य मिळत नाही.स्वत:चे घर नाही. ड्युटीच्या ठिकाणापासून कामाचे ठिकाण बरेच लांब आहे. अनेकाकडे चांगल्या दुचाकी नाहीत.गणवेश, ओळखपत्र आणि दंडुका याशिवाय रक्षणासाठी दुसरे साधन नाही, अशी अनेक कारणे आहेत. तरीसुद्धा या लॉकडाउन काळात सुरक्षा- रक्षक अविरत सेवा बजावत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या