पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:27 PM2019-07-01T23:27:31+5:302019-07-01T23:27:38+5:30

संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.

Three out of disaster management in Panvel | पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

पनवेलमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे तीनतेरा, नालेसफाईची पोलखोल

Next

- वैभव गायकर

पनवेल : पनवेल परिसरात मागील तीन दिवसांपासून बरसलेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत केले आहे. संततधारेमुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पुन्हा एकदा नालेसफाईची पोलखोल झाल्याचे पाहावयास मिळत आहे.
सोमवारी पावसाचा जोर कायम होता. विशेष म्हणजे रायगड जिल्ह्यात सर्वात जास्त सरासरी पावसाची नोंद पनवेल तालुक्यात झाली आहे. तालुक्यात सोमवारी २०७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्ह्यातील १६ तालुक्यापैकी पनवेल तालुक्यात सर्वात जास्त पर्जन्यमान झाले. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागले. पालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात मोठ्या अतिवृष्टीचा फटका बसला आहे. पालिका क्षेत्रातील सिद्धी करवले गावात वीजपुरवठा मागील दोन दिवसापासून खंडित झाला आहे. महावितरणने बसविलेले विद्युत खांब अतिवृष्टीमुळे कोसळल्याने ग्रामस्थांना दोन दिवस अंधारात घालवावे लागले. पनवेल शहरातील एचओसी आदिवासी वाडीत देखील मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी शिरले होते. १५ ते २० घरांची लोकवस्ती असलेल्या या आदिवासी वाडीत साचलेले पाणी बाहेर काढण्यासाठी केवळ एकच पंप याठिकाणी कार्यान्वित होता. पनवेल तालुका क्रीडा संकुलाच्या समोरच ही आदिवासी वाडी आहे. या परिसरात करण्यात आलेल्या भरावामुळे ही परिस्थिती उद्भवली होती. पनवेल महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र मुख्यालयाजवळील अग्निशमन केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र सक्षम असे आपत्ती व्यवस्थापन केंद्र उभारण्यास पालिकेला अपयश आल्याचे पहावयास मिळाले आहे. पालिकेच्या मालकीची बोट नसल्याने आपत्कालीन परिस्थितीवर नवी मुंबई महानगरपालिकेकडे किंवा सिडकोची मदत पालिकेला घ्यावी लागणार आहे. सध्याच्या घडीला पालिकेच्या मार्फत प्रभागनिहाय आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे. मात्र या केंद्रांमध्ये आवश्यक सामुग्री उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापनाची धुरा आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे आदी ठिकाणी प्रभागनिहाय आपत्ती व्यवस्थापन केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत. तर मुख्य केंद्र पनवेल अग्निशमन केंद्रात स्थापन करण्यात आलेले आहेत. सध्याच्या घडीला पनवेल महानगर पालिकेत नोकरभरती झाली नसल्याने अपुरा मनुष्यबळाचा फटका पालिका कर्मचाऱ्यांवर पडत आहे. विविध विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाºयांवरच आपत्ती व्यवस्थापनाचा भार आहे.

प्रभागनिहाय पालिकेची आपत्ती व्यवस्थापन केंद्रे
खारघर, कळंबोली, कामोठे, नावडे आदींसह पनवेल अग्निशमन केंद्रात मुख्य आपत्ती व्यवस्थापन केंद्रे कार्यान्वित आहे. याकरिता ०२२२७४५८०४० /४१/४२ या क्रमांकाची हेल्पलाइन पालिकेने सुरु केली आहे.

तहसील कार्यालयाचे इतर प्राधिकरणाशी समन्वय
पनवेल महानगर पालिका क्षेत्र वगळता पनवेल तहसील कार्यालयामार्फत देखील आपत्ती व्यवस्थापन करण्यात येत आहे.
तहसीलदार अमित सानप हे याकरिता स्वत: इतर प्राधिकरणाशी समन्वय साधून आपत्कालीन परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
आवश्यकता भासल्यास सिडको, महानगर पालिका, एमआयडीसी आदी प्राधिकरणाची मदत घेत असल्याचे तहसीलदार सानप यांनी सांगितले.

Web Title: Three out of disaster management in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :panvelपनवेल