शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

पर्यावरणासाठी तीन देशांचा सायकल प्रवास; सायकलपटू वंदना भावसारचा पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2020 23:54 IST

तीस दिवसांत कापले २०२० किमी अंतर

अरुणकुमार मेहत्रे

कळंबोली : नागरीकरण, औद्योगिकीकरण आणि वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. जगभरात ही समस्या भेडसावत आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी अनेक पर्यावरणप्रेमींनी पुढाकार घेतला आहे. त्यापैकी पनवेल येथील वंदना भावसार या एक आहेत. त्यांनी मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर अशा तीन देशांमध्ये सायकल प्रवास करून झीरो कार्बनचा संदेश दिला. वंदना यांनी तीन देशांत दोन सहकाऱ्यांसह सायकलवरून २०२० किमी अंतर पार केले आहे.

विचुंबे येथील रहिवासी असलेल्या वंदना भावसार एका शाळेमध्ये नोकरी करीत होत्या. त्यांना ट्रेकिंगची आवड होती. मात्र महिलांना सुदृढ आरोग्याचा संदेश देण्यासाठी त्यांनी सायकलिंग सुरू केले. पनवेल-गोवा त्यानंतर शिर्डी, मनाली, कारगिल, कच्छ, द्वारका, दिव, नवापूर ते महाबळेश्वर असा सायकल प्रवास त्यांनी केला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगांवरही त्यांनी सायकलसवारी केली.

भारताबरोबरच अन्य देशही पर्यावरणाबाबत जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवीत आहेत, त्यात आपणही सहयोग नोंदवावा, या उद्देशाने केरळच्या अजिता बाबुराज आणि बडोद्याच्या पिनल पार्लेकर या दोघींसह मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर या देशांमध्ये सायकलिंग करण्याचा दृढनिश्चय केला. आणि २८ जानेवारीला त्या तिघी रवाना झाल्या. झीरो कार्बन फूट प्रिंट हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी थायलंडमध्ये ११ दिवस सायकलिंग केले.ठिकठिकाणी जंगी स्वागतथायलंडनंतर त्यांनी मलेशियात बारा दिवस प्रवास केला. त्यांच्या तीन देशांच्या सायकल प्रवासाचे सर्वत्र स्वागत झाले. त्यानंतर सिंगापूरमधील हवामान, नियम, कायदे, तेथील माणसे सर्व भिन्न असतानाही त्यांच्या प्रवासात खंड पडला नाही. एक महिना कुटुंबीयांपासून दूर राहून त्यांनी जवळपास दोन हजार किमीपेक्षा जास्त सायकल प्रवासाचे आवाहन सहज पेलले. यासाठी समिधा फाउंडेशन पनवेलचे त्यांना सहकार्य लाभले.

टॅग्स :Cyclingसायकलिंगenvironmentपर्यावरण