शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
6
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
7
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
8
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
9
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
10
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
11
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
12
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
13
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
14
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
15
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
16
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
17
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
18
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
19
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!

महापेतील तीन कंपन्या जळून खाक; सात तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 02:24 IST

महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत.

नवी मुंबई : महापे एमआयडीसी येथील पॅथोपॅक कंपनीला आग लागल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. ही आग लगतच्या दोन कंपन्यांमध्येही पसरल्याने तीनही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. कंपन्यांमधील पुठ्ठे व केमिकलने पेट घेतल्याने सुमारे सात तासांनंतर ती आटोक्यात आली.ऐरोली येथील एमएसईबीच्या सबस्टेशनला लागलेल्या आगीनंतर शनिवारी पहाटे शहरात आगीची दुसरी घटना घडली. यामध्ये महापे एमआयडीसीमधील तीन कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. पॅथोपॅक, मालविका व मॅच्युटॅक अशी तीन कंपन्यांची नावे आहेत. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सुरुवातीला पॅथोपॅक कंपनीत आग लागली. या वेळी कंपनीतील कामगारांनी बाहेर पळ काढून स्वत:ला सुरक्षित करून घेतले; परंतु कंपनीतील कागदी पुठ्ठ्यांनी पेट घेतल्याने काही वेळातच आगीची तीव्रता वाढली. त्यामुळे ही आग लगतच्याच मालविका या कापड कंपनीपर्यंत पसरली. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवाण्नांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याच्या कामाला सुरुवात केली; परंतु आग आटोक्यात येत नसल्याने त्यांच्या मदतीला महापालिका, सिडको, रिलायन्स यांचे अग्निशमन दलाचे बंदही घटनास्थळी दाखल होते. त्यांच्याकडून सुरू असलेल्या अथक प्रयत्नानंतर सुमारे सात तासांनंतर आग आटोक्यात आली. तोपर्यंत तीन कंपन्या जळून पूर्णपणे खाक झाल्याने कोट्यावधीच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे; परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचे अग्निशमन अधिकारी आर. बी. पाटील यांनी सांगितले. शिवाय, आगीचे कारणही अद्याप कळू शकले नसून, त्याच्या कारणांचा शोध घेतला जाणार असल्याचेही ते म्हणाले. आगीच्या या घटनेमुळे परिसरातील इतर कंपन्यांनाही धोका निर्माण झाला होता. औद्योगिक क्षेत्रातील सर्वच कंपन्या एकमेकांना लागून असल्याने एका कंपनीला आग लागल्यास ती शेजारच्या कंपनीपर्यंत पसरते. या दुर्घटनेतही आगीच्या ठिणग्या शेजारच्या कंपनीवर पडल्याने इतर दोन कंपन्यांपर्यंत आग पसरली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई