शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

एफएसआय घोटाळ्यामुळे हजारो ग्राहकांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 02:55 IST

उपलब्ध नसलेल्या चटई क्षेत्राचीही विक्री : पनवेल महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्रे थांबविली

पनवेल : सिडको नोडमध्ये नवी मुंबई व पनवेल महापालिका क्षेत्राअंतर्गत बांधकाम परवानग्या देताना कपबर्ड व फ्लॉवरबेडच्या माध्यमातून एफएसआय घोटाळा झाला होता. यासंदर्भात राज्य शासनाने सिडकोला जाब विचारात ३ आॅगस्ट २0१७ रोजी सिडकोला मार्गदर्शक तत्त्व जारी केले होते. पनवेल महानगर पालिका सिडकोच्या नियमावलीचे पालन करीत असल्याने राज्य शासनाच्या पत्राचा आधार घेत पनवेल महानगर पालिकेने देखील नियमाचे उल्लंघन करणाऱ्या इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र थांबविले आहे.सिडको नोडमध्ये हजारो ग्राहकांची फसवणूक झालेली आहे. तसेच कित्येक करोडो रुपयांचा हा घोटाळा सिडको अधिकाºयांच्या संगनमताने झाला असल्याने सामाजिक कार्यकर्ते संजय सुर्वे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यासंदर्भात पनवेल महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी १३ एप्रिल २0१८ रोजी शासनाला पत्र पाठवून सिडको नोडमधील पालिकेत समाविष्ट इमारतींच्या भोगवटा प्रमाणपत्राविषयी अभिप्राय राज्य शासनाच्या नगरविकास खात्याच्या प्रधान सचिवांकडून मागितला होता. पालिकेत समाविष्ट इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र द्यावे किंवा कसे यासंदर्भात विचारणा या पत्राद्वारे करण्यात आली होती. मात्र अद्याप राज्य शासनाचा अभिप्राय आला नसल्याने अनेक इमारतींचे भोगवटा प्रमाणपत्र रखडले आहेत. पनवेल महानगर पालिकेत खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा, नवीन पनवेल आदी सिडको नोडचा समावेश आहे. याचिकाकर्ते सुर्वे यांच्या म्हणण्यानुसार या एफएसआय घोटाळ्यात हजारो करोडोचा घोटाळा झाला आहे. हयात नसलेला एफएसआय देखील ग्राहकांना विकण्यात आला आहे. या प्रकरणी ३ आॅगस्ट २0१७ रोजी सिडकोला मार्गदर्शक सूचना जारी करीत संबंधित अधिकाºयावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र अद्याप एकाही अधिकाºयावर कारवाई करण्याची तसदी सिडकोमार्फत घेण्यात आली नसल्याचा आरोप याचिकाकर्ते सुर्वे यांनी केला आहे. यासंदर्भात सिडकोचे शहर अभियंता संजय कटेकर यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, पनवेल महानगरपालिका ही सिडकोच्या बांधकाम नियमावलीनुसार काम करीत आहे. कपबर्ड, फ्लॉवरबेडसंदर्भात सिडकोने तयार केलेल्या नियमावलीसंदर्भात शासनाची मंजुरी घेतली नाही. अशाप्रकारच्या इमारतींना पनवेल महानगर पालिका भोगवटा प्रमाणपत्र देत नाही. शासनाचा आदेश मिळाल्यानंतरच या संदर्भात पालिका योग्य तो निर्णय घेईल. पनवेल महानगर पालिकेचा नगरविकास विभाग नव्याने अस्तित्वात येणार आहे.

टॅग्स :Homeघर