शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
3
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
4
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
5
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
6
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
7
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
8
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
9
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
10
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
11
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
13
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
14
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
15
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
16
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
17
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
18
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
19
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
20
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली

तीन महिन्यांत ‘त्या’ इमारती बनल्या धोकादायक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 04:23 IST

नवी मुंबई शहरातील ३७८ इमारती महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत.

- कमलाकर कांबळेनवी मुंबई  - शहरातील ३७८ इमारती महापालिकेने धोकादायक घोषित केल्या आहेत. विशेष म्हणजे डागडुजी करून वापरास अनुकूल असल्याचा तीन महिन्यांपूर्वी निर्वाळा देणाऱ्या महापालिकेने कोपरीतील सिडकोच्या बैठ्या इमारतींचा या यादीत समावेश केला आहे. त्यामुळे महापालिकेच्या भूमिकेविषयी रहिवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.पावसाळ्याच्या अगोदर सालाबादप्रमाणे महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी घोषित केली आहे. या यादीत कोपरी सेक्टर २६ येथील आठ रहिवासी सोसायट्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी महापालिकेच्या आवाहनानुसार येथील सोसायट्यांनी आपल्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करून घेतले आहे. या अहवालाच्या आधारे महापालिकेने या सोसायटीतील इमारती किरकोळ दुरुस्ती प्रवर्गात (शासन परिपत्रक, सी-३) मोडणाºया असल्याचे स्पष्ट केले होते. ३0 मार्च २0१७ रोजी येथील चिंतामण को-आॅप. हाउसिंग सोसायटीला यासंदर्भात पत्र देवून तातडीने किरकोळ दुरुस्ती करून त्यासंबंधीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या होत्या. अशा प्रकारचे पत्र या विभागातील सर्व सोसायट्यांना दिले होते. त्यानुसार संबंधित सोसायट्यांनी आवश्यकतेनुसार किरकोळ दुरुस्तीची कामे हाती घेतली. परंतु त्यानंतर लगेच म्हणजे अवघ्या तीन महिन्यांत म्हणजेच २८ जुलै २0१७ रोजी महापालिकेने येथील सर्व इमारतींचा धोकादायक यादीत समावेश केला. यावर्षी तर या इमारतींचा अतिधोकादायक यादीत समावेश करण्यात आला आहे. तशा आशयाचे फलक सोसायटीच्या आवारात लावण्यात आले असून रहिवाशांनी तातडीने या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रहिवाशांत कमालीचा असंतोष पसरला आहे.महापालिकेच्या भूमिकेवर संशय३0 मार्च २0१७ रोजीच्या नोटीसद्वारे महापालिकेने या इमारती किरकोळ दुरुस्ती प्रवर्गात मोडणाºया असल्याचे स्पष्ट केले होते. ही नोटीस अतिक्रमण विभागाच्या उपायुक्त कार्यालयाकडून बजावण्यात आली होती. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यानंतर म्हणजेच २८ जुलै २0१७ रोजी महापालिकेच्या वाशी विभाग कार्यालयाने पुन्हा नोटीस बजावून या इमारती धोकादायक असून त्या त्वरित रिकाम्या करण्याचे निर्देश दिले. विशेष म्हणजे कोपरी सेक्टर २६ हा परिसर महापालिकेच्या तुर्भे विभागात (वॉर्ड डी) मोडतो. असे असताना वाशी विभाग (वॉर्ड सी) कार्यालयाकडून नोटीस कोणत्या आधारे बजावण्यात आली, असा सवाल चिंतामण को-आॅप. हाउसिंग सोसायटीचे अध्यक्ष संजय कोचरेकर आणि सेक्रेटरी एस.ए. सोडनवार यांनी उपस्थित केला आहे.महापालिकाआयुक्तांना निवेदनसात दिवसांच्या आत या इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना महापालिकेने येथील रहिवाशांना दिल्या आहेत. त्यानंतर विद्युत व पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असे बजावण्यात आले आहे. त्यामुळे भयभीत झालेल्या येथील रहिवाशांनी स्थायी समितीच्या माजी सभापती शुभांगी पाटील यांच्यासमवेत महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची भेट घेवून हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी रहिवाशांना दिले आहे. असे असले तरी शुभांगी पाटील यांनी महापालिकेच्या गलथान कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.रहिवासी हवालदिल : कोपरी सेक्टर २६ येथे सिडकोने बांधलेल्या बी टाईपच्या एक आणि दोन मजल्याच्या २२५ इमारती आहेत. या इमारती आठ हाउसिंग सोसायट्यात विभाजित करण्यात आल्या आहेत. येथे एकूण ९६0 कुटुंबे राहत आहेत. ही सर्व कुटुंबे अल्प व मध्यम आर्थिक गटातील आहेत. त्यामुळे इमारती रिकाम्या करण्याचे फलक सोसायटीच्या समोर लागल्याने रहिवासी हवालदिल झाले आहेत.पुनर्बांधणीसाठीच धोकादायक यादीत?शहरात सध्या जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्बांधणीचे वारे वाहू लागले आहे. सिडकोने कोपरी सेक्टर २६ येथे बांधलेल्या इमारती चाळीस वर्षे जुन्या आहेत. शहरातील अन्य इमारतींच्या तुलनेत या इमारतींची स्थिती ठीक आहे. असे असले तरी महापालिकेतील काही अधिकाºयांना हाताशी धरून काही घटकांकडून या इमारती जाणीवपूर्वक धोकादायक असल्याचा आभास निर्माण केला जात असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईnewsबातम्या