शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
3
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
4
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
5
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
6
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
7
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
8
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
9
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
10
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
11
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
12
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
13
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
14
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
15
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
16
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
17
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
18
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
19
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
20
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा

दिवाळीमध्ये शहरात आगीच्या १५ घटना, अग्निशमन दलावरील ताण वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 02:46 IST

दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

नवी मुंबई : दिवाळीच्या चार दिवसांमध्ये महापालिका क्षेत्रामध्ये आग लागल्याच्या तब्बल १५ घटना घडल्या आहेत. उद्योजकांसह किरकोळ दुकानदार व गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये अग्निशमनविषयी उपाययोजना फक्त नावालाच असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांमधील उदासीनतेमुळे अग्निशमन दलावरील ताण वाढू लागला आहे.नेरुळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटच्या समोरील झोपडपट्टीमध्ये १७ आॅक्टोबरला फटाक्यांमुळे आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन आग नियंत्रणामध्ये आणली. सीवूड सेक्टर ४२ ए गणपती अपार्टमेंटच्या समोरील झोपड्यांनाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आग लागली. याच दिवशी तुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीलाही आग लागली. सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीमध्ये वेल्डिंगचे काम सुरू होते. ठिणगीमुळे कंपनीमधील केमिकलने पेट घेतला. केमिकलचा स्फोट झाल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन तासांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग नियंत्रणामध्ये आणली. वास्तविक कंपनीमध्ये वेल्डिंग व इतर कामे करत असताना आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक होते. केमिकल कंपनीमध्ये विशेष दक्ष असणे आवश्यक असते; परंतु योग्य काळजी घेतली गेली नसल्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग नक्की कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सुदैवाने या घटनेमध्ये कंपनीमधील एकही कामगार गंभीर जखमी झालेला नाही. सर्वांना वेळेत घराबाहेर काढण्यात यश मिळविले. या घटनेमुळे दिवाळीच्या पहिल्याच दिवशी अग्निशमन दलावरील ताण वाढला व सर्व अग्निशमन कर्मचाºयांना पुढील चार दिवस दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.जुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसºया मजल्यावर शुक्रवारी आग लागली. पेट्रोल पंपाजवळच आग लागल्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रॉकेटमुळे ही आग लागल्याचा अंदाज रहिवाशांनी व्यक्त केला. आग लागताच परिसरामध्ये बघ्याची गर्दी जमली होती. विजय साळे व विनोद लोखंडे व सोसायटीमधील नागरिकांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून आग नियंत्रणामध्ये आणली. तुर्भे सेक्टर २३ मधील जनता मार्केटमध्येही १९ आॅक्टोबरला दुकानांना आग लागली होती. महादेव कलेक्शन या कपड्यांच्या दुकानांना पहाटे ५ वाजताच आग लागली. ही आगही फटाक्यांमुळे लागली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईमध्ये पाच दिवसांमध्ये तब्बल १५ ठिकाणी आग लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये सर्वाधिक ७ घटना वाशी परिसरामध्ये घडल्या आहेत. यानंतर ५ घटना नेरुळ अग्निशमन दलाच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्या असून, तीन घटना ऐरोलीच्या कार्यक्षेत्रामध्ये घडल्याची नोंद झाली आहे.आग वेळेत नियंत्रणामध्ये आणण्यात यश आले आहे. करोडो रुपयांचे नुकसान झाले असले तरी जीवितहानी व कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अधिकाºयांनी दिली.>नियम तोडणाºयांवर कारवाई नाहीशहरातील प्रत्येक गृहनिर्माण सोसायटी, व्यावसायिक दुकान व एमआयडीसीतील कंपन्यांना अग्निशमनविषयी उपाययोजना करणे आवश्यक आहे. याविषयी नियमित पाहणी करून तसा अग्निशनचा ना हरकत दाखला घेणेही आवश्यक असते; परंतु कोणीही गांभीर्याने अग्निशमनचे नियम पाळत नाही व नियम तोडणाºयांवर प्रशासनाकडूनही काहीच कारवाई केली जात नाही.दिवाळीमध्ये लागलेल्या काही महत्त्वाच्या घटनातुर्भे एमआयडीसीमधील मॅकेमको कंपनीला आग लागून करोडो रूपयांचे नुकसाननेरूळ सेक्टर २८ मधील सद्गुरू अपार्टमेंटसमोरील झोपड्यांना आगनेरूळ सेक्टर १० मधील पंचशील अपार्टमेंटसमोर गाडीला आगसीवूड सेक्टर ४२ मधील गणपती अपार्टमेंटसमोरील झोपड्यांना आगजुईनगर सेक्टर २४ मधील सुंदरम सोसायटीच्या तिसºया मजल्यावरील घरामध्ये आगतुर्भे सेक्टर २३ मधील महादेव कलेक्शन या कपड्याच्या दुकाना आग लागली.