शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
5
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
6
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
7
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
8
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
9
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
10
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
11
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
12
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
14
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
15
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
16
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
17
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
18
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
19
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
20
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा

सिडकोच्या घरांसाठी आता लॉटरी नाही; प्रथम येणाऱ्यास प्राधान्य?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 07:33 IST

CIDCO home : मागील दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यांत पंचवीस हजार घरांची योजना राबविली आहे. यातील जवळपास सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत.

- कमलाकर कांबळे नवी मुंबई : अर्ज मागवून सोडत काढण्याच्या आपल्या पारंपरिक धोरणाला बगल देत प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रस्तावित घरांची विक्री करण्याची योजना सिडकोने आखली आहे. घर विक्रीचे हे सुधारित धोरण नवीन वर्षापासून अमलात आणले जाणार आहे. त्याचाच एक भाग म्हणून जानेवारी महिन्यात सुधारित धोरणाची व्यवहार्यता तपासण्यासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.मागील दोन वर्षांत सिडकोने दोन टप्प्यांत पंचवीस  हजार घरांची योजना राबविली आहे. यातील जवळपास सात हजार घरे विविध कारणांमुळे विक्रीविना पडून आहेत. अनेक ग्राहकांनी पैसे भरणे शक्य नसल्याने ती परत केली आहेत. तर कागदपत्रांची पूर्तता न केल्याने अनेक जणांचे वाटप रद्द करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी सिडकोच्या गृह योजनेत ग्राहकांकडून अर्ज मागविले जात होते. शिवाय त्यासाठी प्रारंभी भरावयाची रक्कमसुद्धा नगण्य होती. याचा परिणाम म्हणून आर्थिक पात्रता नसतानासुद्धा अनेक जण घरांसाठी अर्ज दाखल करीत असत. सोडतीत बहुतांशी असेच ग्राहक पात्र ठरत असल्याने खऱ्या गरजूंना पात्रता असूनही घरापासून वंचित राहावे लागत असे. याला आळा घालण्यासाठी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी घर विक्रीच्या पारंपरिक धोरणातच बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत आगामी काळात  २ लाख १५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी १ लाख घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून बांधकामासाठी कंत्राटदारही नेमण्यात आले आहेत. ही प्रस्तावित १ लाख घरांची पारंपरिक पद्धतीने सोडत न काढता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्री करण्याचा विचार सिडको करत आहे. या सुधारित योजनेचे यशापयश तपासून पाहण्यासाठी काही घरांचा पायलट प्रोजेक्ट राबविण्यात येणार असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी दिली. 

अर्ज करताना भरावी लागणार १0 टक्के रकमअर्जाबरोबर भरावयाच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. नवीन धोरणानुसार आता ही रकम घरांच्या किमतीच्या दहा टक्के इतकी असणार आहे. म्हणजेच घराची किंमत २५ लाख रुपये असेल तर अर्जासोबतअडीच लाख रुपये भरावे लागणार आहेत. यामुळे ज्याची आर्थिक क्षमता आहे, तोच अर्ज करेल. यापुढे घरांसाठीची प्रतीक्षा यादी नसेल. ठरावीक प्रवर्गात पात्रता सिद्ध न झाल्यास संबंधित अर्जदाराला खुल्या प्रवर्गातील उपलब्ध घर देण्याचा विचार सिडको करीत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना या योजनेचा लाभ घेता यावा, असे सिडकोचे प्रयत्न आहेत. त्यामुळे घरांच्या किमती बाजारभावाच्या तुलनेत साधारण १0 लाख रुपयांनी कमी करण्याची योजना आहे. त्यादृष्टीने संबंधित विभागाकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.- डॉ. संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, सिडको

टॅग्स :Homeघरcidcoसिडको