शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई; माॅल्स, जीमखान्यात बरसले रंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 11:26 IST

या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. 

नवी मुंबई : शहरात धूलिवंदन जल्लोषात साजरे करण्यात आले. शहरातील मॉल्स, जीमखाने, पनवेल परिसरातील फार्महाउसमध्ये तरुणाईने जल्लोष केला. गृहनिर्माण सोसायटींसह अनेक ठिकाणी रंगोत्सवाचे आयोजन केले होते. शहरातील सर्व रस्तेही रंगाने न्हाऊन निघाले होते.  धूलिवंदनाचा जल्लोष करण्यासाठी जीमखान्यांसह अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी तरुण, तरुणींच्या रांगा लागल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. 

सोसायट्यांमध्येही आयोजनडीजे व इतर वाद्यांच्या तालामध्ये नृत्याचा फेर धरत रंगांची उधळण सुरू असल्याचे चित्र सर्व ठिकाणी पाहावयास मिळाले. सर्व गृहनिर्माण साेसायट्यांमध्येही रंगोत्सवाचे आयोजन केले होते. पहाटेपासून रोडवरही दिसेल त्याच्यावर रंग उधळला जात होता. 

नैसर्गिक रंगांचा वापर वाढला या वर्षी नैसर्गिक रंगांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होत असल्याचे पाहावयास मिळाले. काही प्रमाणात केमिकलमिश्रित रंगांचाही वापर केला जात होता.  बंदी असूनही शहरात रंग उधळण्यासाठी प्लास्टिक पिशव्या, फुग्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात आला. धूलिवंदन दिवशी मद्यपान करून रस्त्यावर अनेकांनी धिंगाणा घालण्यास सुरुवात केली होती. अशा टपोरींवर पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली होती. अनेकांना पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईHoliहोळी 2024