शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतील ती वनराई वाचण्याची चिन्हे; गणेश नाईकांच्या पुढाकारानं २०० वृक्षांना जीवदान

By नारायण जाधव | Updated: June 27, 2024 16:19 IST

मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.

नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे येथील एमआयडीच्या भूखंडावरील २०० वृक्षांना जीवदान मिळण्याची चिन्हे आहेत. पावणेतील ओएस-७ या भूखंडावर एका खासगी पेट्रो-केमिकल कंपनीने २० वर्षांपूर्वी वनराई विकसित केली आहे. मात्र, याच भूखंडावर एमआयडीसीने स्थानिक प्रकल्पग्रस्तांसाठी भूखंड देण्याची योजना आखली आहे. त्यासाठी किमान २०० वृक्ष तोडावे लागणार आहेत. याला स्थानिक वृक्षप्रेमींसह नॅट कनेक्ट फाउंडेशनने विरोध करून ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांना ते वाचविण्याची गळ घातली होती. तिला प्रतिसाद देऊन नाईक यांनी प्रकल्पग्रस्तांसाठी नवा भूखंड शोधण्याचे निर्देश एमआयडीला दिले आहेत.

वनराईने बहरलेला हा भूखंड वाचविण्यासाठी याआधी येथील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ई-मेल पाठवला असून त्यांनी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे आणि नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांना या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे. अशातच मुंबईतील सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी.एन. कुमार यांनी शहरातील अनेक पर्यावरणीय समस्यांसह हा भूखंड वाचविण्यासाठी नाईक यांंची भेट घेऊन चर्चा केली.

तसेच राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात शहरातील पर्यावरणाचे विषय मांडण्याची त्यांना विनंती केली. यानंतर नाईक यांनी पर्यावरणप्रेमींच्या मागणीला पाठिंबा देऊन एमआयडीसीला ओएस-७ हा भूखंड सोडून प्रकल्पांसाठी दुसरी पर्यायी जागा शोधण्यास सांगितले आहे.

हिरवळ वाचविण्याची जबाबदारी महापालिकेचीएवढेच नव्हे तर काळजी करू नका, जर कोणी झाडांना हात लावण्याचा प्रयत्न केला तर मी प्रत्यक्षपणे घटनास्थळी येईन, असे आश्वासन नाईक यांनी दिले असल्याचे कुमार म्हणाले. एक एकरचा भूखंड हा मुळात दलदलीचा परिसर होता. एमआयडीसीत हायड्रोकार्बन्सचा व्यवहार करणाऱ्या खासगी कंपनीने २० वर्षांपूर्वी तो हरित क्षेत्र म्हणून विकसित केला होता. कंपनीने वृक्षारोपण केले असून, आता २०० परिपूर्ण झाडे बहरली आहेत. यात वाढलेली खजुरासह अनेक फुलझाडे आहेत. आता ही हिरवळ वाचवण्याची जबाबदारीही नवी मुंबई महापालिकेेची आहे. त्यासाठी अमृत मिशनच्या निधीचा वापर करावा, अशी सूचना बी.एन. कुमार यांनी केली आहे.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईक