शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान नवी मुंबईत येणार, पण सभा नेमकी घेणार कुठे? सिडकोसमोर माेठा पेचप्रसंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 14:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा-बारा दिवसांपासून  कामाला लागल्या आहेत.

नवी मुंबई : राज्य सरकारने नवी मुंबईत नारीशक्ती सन्मान सोहळ्याचे  आयोजन केले आहे.  त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी खारघर येथील सेंट्रल पार्क मैदान निश्चित केले होते. त्या अनुषंगाने प्राथमिक कार्यवाहीसुद्धा सुरू केली होती. त्यानुसार पंतप्रधान कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी सेंट्रल पार्क मैदानाची पाहणी केली. त्याचबरोबर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या जागेसह इतर काही ठिकाणांचीही या पथकाने पाहणी केल्याचे समजते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित कार्यक्रम कुठे होणार याबाबत अधिकाऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी मुंबईतील नियोजित दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा मागील दहा-बारा दिवसांपासून  कामाला लागल्या आहेत. या  सोहळ्याची तारीख अद्याप निश्चित झाली नसली तरी हा कार्यक्रम खारघर येथील सिडकोच्या सेंट्रल मैदानावर होईल, असे सुरुवातीपासून बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर रायगडचे जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी गेल्या आठवड्यात संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली होती. याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो सेवेचे उद्घाटन करण्याची सिडकोची योजना आहे. 

दसऱ्याच्या मुहूर्ताला कार्यक्रमाची शक्यताया नियोजित कार्यक्रमाच्या तारखेवरूनसुद्धा अद्याप संभ्रम आहे. कारण पंतप्रधान कार्यालयाकडून या कार्यक्रमाविषयीचा कोणताही कार्यक्रम आयोजकांना प्राप्त झालेला नाही. असे असले तरी १३ ते १६ ऑक्टोबर दरम्यान कोणत्याही एका तारखेला हा कार्यक्रम होईल, अशी चर्चा आहे. प्रत्यक्षात मात्र ही शक्यतासुद्धा धूसर असून दसऱ्याचा मुहूर्त साधण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

- सिडको व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी सोमवारी मुंबईत बैठक घेऊन कार्यक्रमाबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील पथकाने कार्यक्रम स्थळांची व तयारीची पाहणी केल्याचेही समजते. 

- या पथकाने सिडकोच्या बेलापूर येथील गेस्ट हाऊसमध्ये बैठक घेऊन चर्चा केली.  दरम्यान, सेंट्रल पार्कऐवजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  जागेबाबत चर्चा केल्याचे समजते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको