शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची माहिती देण्यास माहिती आयोगाची ना ना, सुनावणीनंतर चार महिन्यांनी दिला आदेश

By नारायण जाधव | Updated: August 26, 2023 17:33 IST

Navi Mumbai: राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून फुटून बाहेर पडून सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यपाल कार्यालयास देण्याचे धैर्य राज्य माहिती आयोगानेही दाखविलेले नाही.

- नारायण जाधवनवी मुंबई - राज्यात जून २०२२ मध्ये शिवसेनेतून फुटून बाहेर पडून सत्ता स्थापन करणाऱ्या शिंदे सरकारच्या सत्तासंघर्षाची कागदपत्रे उपलब्ध करून देण्याचे आदेश राज्यपाल कार्यालयास देण्याचे धैर्य राज्य माहिती आयोगानेही दाखविलेले नाही. माहिती आयोगाच्या या नकारघंटेविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे नवी मुंबईतीलमाहिती अधिकार कार्यकर्ते संतोष जाधव यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडून भाजपसोबत जून २०२२ मध्ये सोयरीक करून सत्ता स्थापन केली. ते करताना कायदेशीर बाबींची पूर्तता राज्यपाल कार्यालयाने केली होती की नाही याची खातरजमा करण्यासाठी नवी मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांनी राज्यपाल कार्यालयाकडे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर कोणत्या पक्षाने सत्तास्थापनेचा दावा केला, त्यास कोणी कोणी पाठिंबा दिला, यासोबतच राज्यपालांनी सरकार स्थापनेसाठी कोणत्या पक्षास आमंत्रण दिले याची माहिती मागविली होती. ही कागदपत्रे राज्यपाल कार्यालयात नसून ती राज्यपालांकडे असल्याचा दावा करून जेव्हा ती उपलब्ध होतील तेव्हा देऊ असे सांगून जाधव यांची राज्यपाल कार्यालयाने बोळवण केली होती. यावर जाधव यांनी प्रथम अपिल केले होते. त्यावर न्यायालयीन प्रक्रिया सुरू असून महामहिम राज्यपाल त्यात प्रतिवादी असल्याने ती कागदपत्रे राज्यपालांकडे असल्याचे सांगून माहिती त्यांचे अपिल निकाली काढले होते.

यानंतर जाधव यांनी याबाबत राज्य माहिती आयोगाकडे द्वितीय अपिल दाखल केले होते. त्याची सुनावणी १४ एप्रिल २०२३ रोजी पूर्ण झाल्यावरही आदेश देण्यास राज्य माहिती आयोगाने चार महिने घेतले. राज्य माहिती आयोगाने जाधव यांचे अपिल नाकारताना सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असून तसेच विधानसभा सभापती यांच्याकडेही याबाबत सुनावणी सुरू असल्याने महिती देता येणार नसल्याचे कारण आदेशात नोंदवले आहे. तर आयोगाने नोंदवलेली कारणे ही तथ्यहीन असून याबाबतची सर्वोच्च न्यायालयातील याचिका एप्रिल २०२३ मध्येच निकाली निघाली असल्याने माहिती आयोगाचे निरीक्षण आक्षेपार्ह आहे असे जाधव यांचे म्हणणे आहे. आयोगाने आदेशात नोंदवलेली कारणे दिशाभूल करणारी आहेत. सभापती राहुल नार्वेकरांकडे सुरू असलेली सुनावणी ही आमदार अपात्रतेबाबत असून त्याचा मी मागितलेल्या कागदपत्रांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे वर्षभर लढा देऊनही पदरी उपेक्षाच पडल्याने या विरोधात न्यायालयात जाण्याशिवाय पर्याय नाही. - संतोष जाधव, सामाजिक कार्यकर्ते

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेRight to Information actमाहिती अधिकारNavi Mumbaiनवी मुंबई