शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळाजवळ सर्वात मोठी बाजार समिती उभारणार, पणनमंत्री रावल यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:47 IST

बाजार समितीचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट आशिया खंडातील सर्वात मोठे मार्केट आहे. पुढील काळात जगातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती निर्माण करणार असून, यासाठी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, जेएनपीटी बंदराजवळ प्रशस्त जागा शोधण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सोमवारी नवी मुंबईत दिली.वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देऊन त्यांनी व्यापारी, संचालक मंडळाशी चर्चा करून मार्केटची पाहणी केली. पणन विभागाचा आढावा घेऊन भविष्यातील उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. बाजार समितीतील जुन्या इमारतींचा पुनर्विकास वेगाने केला जाईल. सर्वांना विश्वासात घेऊन धोरणे आखली जातील, असे रावल यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. बाजार समितीमध्ये आमदार शशिकांत शिंदे, कामगार नेते नरेंद्र पाटील व संचालक मंडळाने पणनमंत्र्यांचे स्वागत केले. बाजार समितीचे नवीन प्रकल्प व शासनाकडून काय सहकार्य  हवे याचीही माहिती दिली. संस्थेची माहिती घेतल्यानंतर रावल यांनी प्रत्यक्षात मार्केटची पाहणी केली.

आवश्यक सुधारणांकडे वेधले लक्ष --  मुंबई बाजार समितीमधील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार. महाराष्ट्रातील कृषिमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे रावल यांनी सांगितले. -  व्यापाऱ्यांनी मार्केटमध्ये कोणत्या सुधारणा आवश्यक आहेत त्याकडे रावल यांचे लक्ष वेधले. -  बाजार समिती सभापती अशोक डक, सचिव पी. एल. खंडागळे,  बाजार समिती संचालक संजय पिंगळे, आदी उपस्थित होते

टॅग्स :airplaneविमानMarketबाजार