शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांसाठी प्रशासन सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2023 15:43 IST

बेटावर घुमणार  बम. . . बम. . . भोलेचा सूर 

मधुकर ठाकूर -

उरण : जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने हजारो शिवभक्तांचे बम. . . बम. . . भोलेचे सूर घुमणार आहेत. बेटावर येणाऱ्या हजारो भाविकांची सुरक्षितता, स्वागत आणि जाण्या-येण्याच्या व्यवस्था करण्यासाठी पोलिस, बंदर, महसूल यंत्रणेसह ग्रामपंचायत सज्ज झाली आहे. मात्र या वर्षी घारापुरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात ६५ रुपये दर आकारणी करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा तिकीट दरात पाच रुपये वाढ झाली असली, तरी बेटावर दर्शनासाठी येणाऱ्या हजारो देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्तांमध्ये थोडाही उत्साह कमी होणार नसल्याची शक्यता प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे. 

मुंबईपासुन अवघ्या ११ किमी अंतरावर असलेले घारापुरी बेट सहाव्या शतकातील प्राचीन शिवकालीन लेण्यांमुळे कायम जागतिक प्रसिध्दीच्या झोतात राहिले आहे. काळ्या पाषाणात शिवाची विविध रुपे असलेली अनेक प्रचंड शिल्प आहेत. मोठ्या खुबीने कोरलेल्या शिल्पांमध्ये अर्धनारीश्‍वर शिव, कल्याणमुर्ती, अंधकासुरवध, गंगावतारण शिव, योगीश्‍वर उमा महेश्‍वरमुर्ती आणि २० फुट उंच आणि रुंदीची महेशमुर्ती आदि शिल्पांचा समावेश आहे. 

महाशिवरात्री निमित्ताने बेटावरील या शिवलिंगाच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारोंच्या संख्येने देशी-विदेशी पर्यटक आणि शिवभक्त येतात. त्यामुळे घारापुरी बेटावरील महाशिवरात्रीला जागतिक महाशिवरात्री म्हणूनही ओळखली जाते. 

घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने बेटावर जाण्या-येण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया, जेएनपीए, उरण-मोरा,न्हावा, वाशी, बेलापूर,उलवा,माहूर आदी बंदरातून होड्या,लॉचेस,मचव्यांची सोय आहे. घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी ठिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच धोकादायक ठरणाऱ्या नादुरुस्त रस्त्यावर रेलिंग लावण्यात आले आहे. तसेच भाविकांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी नागरी सुरक्षा दलाचे ४० रक्षक तैनात करण्यात आले असल्याची माहिती घारापुरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच बळीराम ठाकुर यांनी दिली. 

 त्याचबरोबर बेटावर महाशिवरात्री निमित्ताने मोरा-उरण बंदरातुनच दरवर्षी ५० ते ६० हजार भाविक हजेरी लावतात.  मोरा बंदरातुन बेटावर येणाऱ्या शिवभक्त भाविकांसाठी पोलिस, बंदर विभागाच्या माध्यमातून १२ खासगी ट्रॉलर्स तैनात करण्यात आले आहेत.  दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी बोटींच्या एकेरीच्या तिकिट दरात ६५ रुपये तर परतीच्या दुहेरी प्रवासासाठी १३० रुपये दर आकारणी करण्यात आली आहे. मागील वर्षीपेक्षा तिकीट दरात पाच रुपयांनी वाढ करण्यात आली असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी प्रकाश कांदळकर यांनी दिली. तर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  त्यामध्ये स्थानिक ११ कर्मचाऱ्यांसह अधिकारी-६, पोलिस कॉन्स्टेबल-४८ व महिला कर्मचारी - ३५ असे ९० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाशिवरात्रीसाठी येणाऱ्या शिवभक्तांनी नियम पाळून शांतता राखावी आणि पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन न्हावा-शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर यांनी केले आहे.  यासाठी गुरुवारी बेटावर पाहणी दौराही करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.   जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावर महाशिवरात्री निमित्ताने येणाऱ्या हजारो देशी-विदेशी शिवभक्तांमुळे बम. . . बम. . .  भोलेचे सूर घुमणार आहेत. 

उरण तालुक्यातील माणकेश्वर,देऊळवाडी, रेल्वे स्टेशन जवळील निळकंठ शिवमंदिर,होणेश्वर-बोरी, जासई, चिरनेर,आवरे येथील शिवमंदिरातही महाशिवरात्री साजरी केली जाते.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई