शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ लेडीज बार दुसऱ्या दिवशीही सुरू, मनसेच्या आंदोलनाची बारचालकांना भीती नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 10:41 IST

मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.

पनवेल : लेडीज बारबाबतच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्याची दखल घेऊन मनसैनिकांनी २ ऑगस्ट रोजी रात्री १२:००च्या सुमारास पनवेल तालुक्यातील कोन गावाजवळील नाइट रायडर्स बारवर हल्ला चढवला. खळ्ळखट्याक करून बारचे नुकसान केले. मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले.

पनवेलमधील लेडीज सर्व्हिस बार नेहमी चर्चेत असतात. ऑर्केस्ट्रॉ बारच्या नावाखाली याठिकाणी सुरू असलेले अश्लील वर्तन चालते, हे लपून राहिलेले नाही. आजवर शेकडो कारवाया पोलिस, उत्पादन शुल्क विभागाने या बारवर केलेल्या आहेत. पूर्ण पनवेलमध्ये १५ ते २० लेडीज सर्व्हिस बार आहेत. मनसेने ज्या कोन गावाजवळ बार फोडले, त्या परिसरातच ७ लेडीज सर्व्हिस बार आहेत. यामध्ये गोल्ड डीगर, साईनिधी, कपल, टायटन, क्रेजी बॉइस आदी बारचा समावेश आहे. मात्र, ज्या नाइट रायडर्स बारवर मनसेने हल्ला चढवला, तो बार वगळून इतर बारच्या जागांचे भाडे स्थानिकांना मिळते. केवळ नाइट रायडर्स बारच्या जागेचा मालक स्थानिक नसल्याने त्या बारवर मनसैनिकांनी हल्ला चढविल्याची चर्चा आहे. त्यामुळे मनसेचे बारवरील आंदोलन पुढे सुरूच राहणार का? अशी चर्चा आहे. दरम्यान,  संपूर्ण यंत्रणांना हाताशी धरलेल्या बारचालकांना कोणाचीच भीती नसल्याचे स्पष्ट झाले. 

मनसैनिकांना जामीन मंजूरबार तोडफोडप्रकरणी सातही मनसैनिकांना पनवेल न्यायालयाने सोमवारी जामीन दिला. पीआर बाँडवर न्यायालयाने हा जामीन दिला असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन घाटगे यांनी दिली. 

कोन गावाजवळ केलेल्या आंदोलनाबाबत स्थानिक मनसे नेते केसरीनाथ पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी न्यायालयात असल्याचे सांगून या विषयात बोलणे टाळले.

टॅग्स :panvelपनवेलMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेनाMNSमनसे