शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

ठाणे स्थानकाचा होणार ‘मेगा’विकास

By admin | Updated: February 18, 2015 02:38 IST

पश्चिम रेल्वेमार्गावरील काही स्थानकांप्रमाणेच मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला.

मुंबई : पश्चिम रेल्वेमार्गावरील काही स्थानकांप्रमाणेच मध्य रेल्वेमार्गावरील गर्दीचे स्थानक असलेल्या भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) घेतला. त्यासाठी या स्थानकांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास केला जाणार होता. मात्र हा विकास रखडला असून, आता ठाणे स्थानकाचा ‘मेगा’विकास करण्यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी सर्व कागदोपत्री व्यवहार पूर्ण केले जाणार आहेत. भांडुप आणि मुलुंड स्थानकांत ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या दोन्ही भागांचा वाढता विकास आणि स्थानकातली वाढती गर्दी पाहता त्यांचा विकास करणे गरजेचे आहे. रेल्वेला तिकिटांच्या माध्यमातून भांडुप स्थानकातून चार लाख तर मुलुंड स्थानकातून साडेसात लाखांचा प्रतिदिन महसूल मिळतो. हे पाहता या स्थानकांचा व्यावसायिकदृष्ट्या विकास करण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. यासाठी दोन्ही स्थानकांचा सर्व्हे करून २०१३मध्ये त्याचा अहवालही तयार केला. प्रवाशांना आकर्षित करू शकतील, अशा सोयी देण्याचा निर्णयही घेतला. त्यासाठी रेल्वे बोर्डाकडून कामांची मंजुरी मिळवण्यात आली. २०१५पर्यंत भांडुप आणि मुलुंड स्थानकांचा कायापालट करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. फलाटांवर चांगली आसनव्यवस्था, उत्तम दर्जाची प्रसाधनगृहे देतानाच एक मजली रेल्वेची इमारत बांधून त्यामध्ये तिकीट खिडक्या, बुक स्टॉल, खाद्यपदार्थ स्टॉलची सेवा देण्यात येईल. तसेच पंखे, विद्युत रोशणाई बदलताना पार्किंग सुविधाही मोठ्या प्रमाणात प्रवाशांसाठी देण्यात येणार आहे.