अनिकेत घमंडी ल्ल ठाणो
ठाणो जिल्ह्यातून बोरिवली व्हाया कुर्ला / दादर जाणा:या सुमारे दोन लाख रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर. त्यांना लवकरच ठाणो-बोरिवली व्हाया घोडबंदर असा नवा रेल्वे मार्ग मिळण्याची शक्यता आहे. हा अवघा 29 किमीचा रूट असून त्याचा अभ्यास करा अन् पुन्हा तातडीने कळवा, असे लेखी पत्रच मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन (एमआरव्हीसी) ला दिले आहे. त्यानुसार, संबंधित संस्थेनेही काम सुरू केले असले तरीही याबाबत कमालीची गोपनीयता पाळण्यात येत आहे. मार्च महिन्याआधीपासून या प्रस्तावाबाबत सातत्याने पत्रव्यवहार सुरू असून या नव्या रूटला हिरवा कंदील मिळवण्यासाठी कल्याणचे नागरिक ब्रिजेंद्रसिंग युद्धवीरसिंग परमार पाठपुरावा करीत आहेत.
त्यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या मार्गाचे रेल्वेने स्वागत केले असून उपनगरीय लोकलचे जाळे अधिक विस्तारीत करण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम असल्याची प्रतिक्रिया रेल्वे वतरुळात व्यक्त होत आहे. त्यामुळेच या प्रकल्पासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यालयातूनही फिजिबिलिटी तपासण्यासंदर्भात पत्रव्यवहार झाल्याचे ते सांगतात. त्यानुसार, गेल्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाबाबत विचार झालेला नसला तरीही नुकतेच दिवाळीदरम्यान पुन्हा या मार्गाचा अभ्यास व्हावा यासंदर्भातील पत्र रेल्वे बोर्डाने दिल्याचे परमार यांनी स्पष्ट केले.
हा प्रकल्प अस्तित्वात आल्यास सध्याचा 6क् किमीचा प्रवास अवघ्या 29 किमीवर येणार असून त्यातून प्रवाशांचा 1 तास वाचेल. काही प्रमाणात तिकिटासाठी लागणारे पैसेही वाचतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अवघ्या अध्र्या तासात ते ठाण्याहून बोरिवलीला पोहोचू शकतील. परिणामी, दादर आणि कुर्ला स्थानकांतील झुंबड कमी होऊन गर्दीतून घुसमटत कराव्या लागणा:या ब्रेकजर्नीचा त्रस वाचणार असल्याने प्रवाशांसाठी ही पर्वणी ठरेल.
ठाण्याहून घोडबंदरमार्गे बोरिवलीला जाताना ‘दहिसर’ आणि ‘मीरा रोड’ या दोनच ठिकाणांशी हा रूट कनेक्ट होणार आहे.