शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
5
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
6
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
7
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
8
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
9
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
10
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
11
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
12
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
13
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
14
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
15
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
16
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
17
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
18
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
19
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
20
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 

खारघरसह कोपरीतून दहा बांगलादेशींना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 08:47 IST

आश्रय देणाऱ्या घरमालकांवरदेखील होणार कारवाई

नवी मुंबई : शहरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या दहा बांगलादेशींना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. खारघर व कोपरी येथे छापा टाकून ही कारवाई करण्यात आली. त्यांना आश्रय देणाऱ्या व कामाला ठेवणाऱ्यांवरदेखील पोलिसांमार्फत कारवाई केली जाणार आहे. घुसखोरी करून भारतात आलेल्या बांगलादेशींना शहरात आश्रय मिळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या घुसखोरांच्या शोधासाठी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांनी पथक केले होते. त्यात सहायक निरीक्षक अलका पाटील, सविता गुडे, महेंद्र ठाकूर, शिरीष चव्हाण, अनिल मांडोळे, ज्योती अडकमोल, अनिता गोळे, धनश्री घोणसेकर यांचा समावेश होता. त्यांनी शहराच्या विविध भागांत बांधकामांच्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची माहिती मिळवली. त्यात संशयित व्यक्तींची कागदपत्रे पडताळणी करण्यात आली. यामध्ये काहींकडे भारतीय असल्याचा पुरावा नसल्याचे उघड झाले. त्यात खारघरच्या कोपरा येथे १ पुरुष व तीन महिला, तर कोपरी येथे १ पुरुष व ५ महिलांचा समावेश आहे. त्यातील एकजण पासपोर्टद्वारे भारतात आला होता, पण एक वर्षापूर्वी व्हिसा संपूनही तो भारतात लपून वास्तव्य करत असल्याचे तपासात उघड झाले. 

मायदेशी पाठविण्याची तयारी

आराेपींना परत बांगलादेशात पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्याशिवाय इतरही संशयितांची चौकशी करून त्यांची कागदपत्रे पडताळणी सुरू असल्याचे गुन्हे शाखा उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले. त्यांची कागदपत्रे बनावट निघाल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईBangladeshबांगलादेश