शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडण करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
2
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
3
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
4
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
6
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
7
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
8
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
9
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
10
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
11
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
12
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
13
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
14
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
15
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
16
स्कूलबसच्या अपघाताला शाळा संचालकही जबाबदार, पंजाब आणि हरयाणा हायकोर्टाने सुनावले
17
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
18
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर
19
‘धूप से बचने के लिए टोपी तो दिजीए’, रणरणत्या उन्हात कामगार मेटाकुटीला
20
‘एअर टर्ब्युलन्स’ची माहिती मिळणार, प्रवासी सुरक्षेसाठी विशेष सॉफ्टवेअरची ‘इंडिगो’कडून चाचणी

बावखळेश्वर मंदिर आज जमीनदोस्त होणार, जमावबंदी आदेश जारी, परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 5:11 AM

एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : एमआयडीसीमधील बावखळेश्वरसह तिन्ही मंदिरांवर एमआयडीसी गुरुवारी कारवाई करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून येथील १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात येणार आहे. या दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी परिसरामध्ये जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.औद्योगिक वसाहतीच्या जागेवर अतिक्रमण करून बावखळेश्वर, गणेश व महाकाली मंदिराचे बांधकाम करण्यात आले होते. याशिवाय परिसरामध्ये तलावाचे सुशोभीकरण, नारळाची बाग व कार्यालय उभारण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी २०१३मध्ये याविषयी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. जुलै २०१३मध्ये उच्च न्यायालयाने बावखळेश्वर मंदिरासह सीबीडी बेलापूरमधील ग्लास हाउस परिसर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. सर्वोच्च न्यायालयानेही मंदिर अनधिकृत ठरवून त्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. कारवाई न केल्यामुळे प्रशासनाला धारेवर धरले होते. याप्रकरणी कारवाई केली नाही तर अधिकाºयांवरच कारवाई करण्याचा इशारा दिला होता. यामुळे एमआयडीसी प्रशासनाने कारवाईसाठी पोलिसांकडे बंदोबस्त मागितला होता. १३ व १४ डिसेंबरला पोलिसांनी बंदोबस्त दिला असून या परिसरामध्ये जमाबंदी आदेश जारी केला आहे. सहायक पोलीस आयुक्त किरण पाटील यांनी १फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३चे कलम १४४प्रमाणे हा आदेश जारी केला आहे. नवी मुंबई महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ टीटीसी मधील पावणे भागात भूखंड क्रमांक १२ या भूखंडावर बावखळेश्वर मंदिर पक्क्या स्वरूपात बांधले आहे. मंदिराचे विश्वस्त सतीश पाटील व संतोष तांडेल यांनी एमआयडीसी कार्यालयास दिलेल्या पत्रावरून त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेली नाही. एमआयडीसीच्या रजिस्ट्री अस्तित्वात असल्याबाबत एमआयडीसीकडे किंवा पोलीस ठाण्याकडे कोणतीही नोंद नाही. सदरच्या ठिकाणी एकूण तीन मंदिरे असून ते २००९मध्ये बांधण्यात आली आहेत. ही मंदिरे पुरातन नाहीत. एमआयडीसीची १००३५ चौरस मीटर क्षेत्रफळावर तीन मंदिरे आहेत. मंदिराला लागून एकूण १ लाख ३२ हजार ९६५ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. या अतिक्रमणांविरोधात जुलै २०१३मध्ये जनहित याचिका दाखल झाली होती. चार वर्षांपासून मंदिरावर कारवाई होणार की नाही, याविषयी तर्क-वितर्क लढविले जात होते. अखेर प्रशासनाने कारवाईचा निर्णय घेतला असून परिसरामध्ये प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.कारवाईकडेशहरवासीयांचे लक्षबावखळेश्वर मंदिर व परिसरातील बांधकामावर होणाºया कारवाईकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या परिसराला राजकीयदृष्ट्याही महत्त्व असल्याने राजकीय नेते व कार्यकर्त्यांचेही याकडे लक्ष लागले आहे. एमआयडीसी प्रशासन काय कारवाई करते. मंदिर वाचविण्यासाठी आंदोलन केले जाणार का? या सर्वांविषयी शहरभर चर्चा सुरू झाली आहे.पोलिसांनी जारी केलेला मनाई आदेश- बावळखेश्वर मंदिर परिसराच्या १०० मीटर परिसरामध्ये१३ व १४ डिसेंबर रोजी मनाई आदेश जारी करण्यात येत आहे- मंदिर परिसरामध्ये दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे बरोबर घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.- या परिसरामध्ये कोणालाही स्फोटक किंवा दाहक वस्तू घेऊन जाता येणार नाही.- भाले, तलवारी, काठ्या, बंदुका, देशी कट्टे, रिव्हाल्वर व इतर कोणतीही शस्त्रे सोबत घेऊन जाता येणार नाही.- कोणत्याही व्यक्तीच्या चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा पुढाºयाच्या चित्राचे किंवा प्रतिमांचे दहन करता येणार नाही.- मंदिर परिसरामध्ये कोणालाही मोठ्या आवाजात किंवा अर्वाच्च भाषेत घोषणाबाजी करता येणार नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई