शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी काळानुरूप अपडेट राहणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2016 03:38 IST

शिक्षक हा आनंदयात्री आहे. त्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आजचे विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळणारे, टेक्नोसॅव्ही असल्याने शिक्षकांनीही काळानुरूप

पनवेल : शिक्षक हा आनंदयात्री आहे. त्याने बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेतले पाहिजे. आजचे विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळणारे, टेक्नोसॅव्ही असल्याने शिक्षकांनीही काळानुरूप अपडेट राहणे गरजेचे आहे. शिक्षण क्षेत्रात सरकारच्या धोरणामुळे काहीसा गोंधळ असला तरी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करावे, असा सल्ला विधान परिषदेतील शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी पनवेल येथील आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात शिक्षकांना दिला. ‘लोकमत’ व श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०१६’ मोठ्या दिमाखात बुधवारी येथील वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात संपन्न झाला. पनवेल तालुक्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास विधान परिषदेतील शिक्षक आमदार रामनाथ मोते, भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार रामशेठ ठाकूर, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय सोनावणे, दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष परेश त्रिवेदी, उपाध्यक्ष श्रीपाद लेले, महाव्यवस्थापक जयश्री काटकर, ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, ‘लोकमत’चे साहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते. मोते म्हणाले, शिक्षण क्षेत्रात काम करण्यासारखे दुसरे भाग्य नाही. केवळ नोकरी-व्यवसाय म्हणून या क्षेत्राकडे न बघता विद्यादानाचे महत्कार्य हातून होत असल्याने शिक्षकांना दीर्घायुष्य लाभत असल्याचे आढळते. अद्ययावत तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी उंचावली आहे, ते वेगळा विचार करू लागले आहेत. त्यामुळे पूर्वापार चालत आलेल्या उत्तराची अपेक्षा न करण्याचा सल्ला मोते यांनी यावेळी शिक्षकांना दिला. जनसेवा करताना, शिक्षक, उद्योजक ते राजकारणी या प्रवासात ‘लोकमत’ची साथ मिळाल्यानेच लोकांपर्यंत पोहाचू शकलो. गेल्या अनेक वर्षांपासून ‘लोकमत’शी नाळ जोडली असून ती भविष्यातही कायम राहावी, अशी इच्छा यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली. आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा म्हणजे गणेशोत्सवापूर्वी झालेली चांगली सुरुवात असल्याचे विचार ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले. शिक्षणाचे व्यापारीकरण होत असताना शिक्षकांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार देत आहोत. आदर्श शिक्षकांंच्या निवडीची जबाबदारी शाळेकडेच सोपविण्यात आली होती. सोहळ्याच्या माध्यमातून एक नवी संकल्पना साकार होऊन पुढील वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आणखी नावे येतील, असा विश्वास यावेळी व्यक्त केली.