शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

17 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या 'त्या' शिक्षकाला आईमुळे मिळाली होती नोकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:23 IST

शाळेकडून निलंबनाची कारवाई; जुन्या कामांच्या ठिकाणीही होणार चौकशी

नवी मुंबई : सहावी ते आठवीच्या १७ विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याप्रकरणी अटकेत असलेला शिक्षक आईच्या शिफारशीवरून शाळेत नोकरीला लागल्याचे समोर आले आहे. त्या शाळेतून त्याचे निलंबन केले आहे.तो डोंबिवलीत राहणारा असून अविवाहित आहे. संगणक प्रशिक्षण घेतल्यानंतर २००९ पासून त्याने संगणक शिक्षक अनेक ठिकाणी नोकरी केली. एका सामाजिक संस्थेमार्फत तो पालिका शाळेत चार महिन्यांपासून नोकरी करत होता. शाळेच्या वेळापत्रकाव्यतिरिक्त मुलींना प्रशिक्षणासाठी बोलावून तो अश्लील चाळे करायचा. त्यामध्ये दिव्यांग मुलीचाही समावेश आहे. याप्रकरणी शाळेने पोलिसांत तक्रार दिली.तो आईच्या नावाचा वापर करून त्या शाळेत नोकरीला लागला होता. त्याच्या आईने त्या शाळेत काम केले असल्याने तेथे संगणक शिक्षक म्हणून नोकरीची संधी देण्याची मागणी त्याने संस्थेकडे केली. तत्पूर्वी दोन महिने तो संबंधित संस्थेतच अकाउंटचे काम पाहत होता; परंतु टॅली जमत नसल्याने वरिष्ठ त्याच्यावर नाखूश होते. दरम्यान, संबंधित पालिका शाळेत संगणक शिक्षक म्हणून त्याची नियुक्ती केली.जुन्या कामांच्या ठिकाणीही होणार चौकशीत्याने ज्या शाळांमध्ये नोकरी केली त्यात कामोठेतील शाळेसह डोंबिवली, ठाणे आदी ठिकाणच्या खासगी शाळांचा समावेश आहे. पोलिसांकडून त्याच्या या कामांच्या ठिकाणीही चौकशी होणार असल्याने त्याची अशी कृत्ये समोर येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Molestationविनयभंग