- प्राची सोनवणे, नवी मुंबई एखाद्या भागात तीव्र पाणीटंचाई असेल आणि दुसरीकडे मुबलक पाणी उपलब्ध असेल तर ते टंचाईग्रस्त भागाकडे नेणे गरजेचे ठरते. त्याच हेतूने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची संकल्पना पुढे आली. यावर अंकुश राहावा म्हणून सिडको प्रशासन व नवी मुंबई महानगरपालिकेने ही योजना स्वत:कडे ठेवली. मात्र, सध्या त्यातही ठेकेदारांचा शिरकाव झाला आहे. पाणीपुरवठा करण्याचे कंत्राट निघू लागल्यामुळे सरकारी नियंत्रण आपोआपच शिथिल झाले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ ठेकेदार असून, टँकर लॉबी सक्रिय झाल्याचे दिसून येते. यातून गैरव्यवहारांचे प्रकार उघडकीस येत आहे. डिसेंबरपासूनच टँकरवर अवलंबून राहावे लागल्याने आणि पाण्यासारख्या मूलभूत गरजेचेही बाजारीकरण झाल्याने जून महिन्यापर्यंत जगायचे कसे असा प्रश्न शहरातील अनेकांना पडला आहे. प्रत्येक नागरिकाला पाणी विकत घेणे परवडतेच असे नाही. त्यामुळे नागरिक स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्कसाधून पाण्याच्या टँकरची मागणी करतात. महानगरपालिकेकडे स्वत:च्या मालकीचा एकच टँकर असल्याने नागरिकांना पाण्यासाठी खाजगी टँकर आणावा लागतो. प्रामुख्याने उच्चभ्रू वस्तीमधील नागरिक खासगी टँकर मागवतात.शहरातील काही हॉटेलचालक व बांधकाम व्यावसायिकही टँकरद्वारे पाणी विकत घेत आहेत. पाणीटंचाईचा गैरफायदा घेत टँकरचालक नागरिकांकडून खूपच जास्त पैसे घेतात. सिडकोच्या मालकीचे ८ टँकर असून त्यासाठी कोणत्याही प्रकारचे दर आकारले जात नाहीत आणि मागणीनुसार सिडको वसाहतींमध्ये पाण्याचे टँकर त्वरित उपलब्ध करुन दिले जातात. तरीदेखील टँकर चालक वसाहतींमधील नागरिकांकडून अमुक अमुक पैशांची मागणी करतात. खाजगी टँकरसाठी नागरिकांना १२०० ते ३००० रुपयांपर्यंत दर आकारले जातात. पाण्याचा गंभीर प्रश्न असलेल्या कामोठेत २५ ते ३० खाजगी टँकर असून या टँकर चालकांची कोट्यवधीची कमाई सुरू आहे. सीबीडीत १, नेरुळमध्ये ४, वाशीत ४, सानपाड्यात १, तुर्भे परिसरात २, कोपरखैरणेत १, ऐरोलीत १, घणसोलीत १ आणि दिघ्यात १ असे एकूण १६ पाणीपुरवठा ठेकेदार, २७ टँकर पुरवठाधारक असून टँकरच्या वाढत्या मागणीमुळे या टँकर लॉबीला चांगले दिवस आले आहेत. नवी मुंबईमध्ये २४ तास पाणीपुरवठा असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून या शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली होती. नवी मुंबईत किमान मूलभूत गरजा, पाणी, रस्ते चांगले असल्याने या शहराला लोकांकडून राहण्यासाठी पसंती दिली जात आहे. मात्र आता नवी मुंबईकरांच्याच तोंडचे पाणी पळाले. मोरबे धरणातील पाणीसाठा फक्त ४५ टक्क्यांवर आला आहे. यामुळे राहिलेला पाणीसाठा पुढील वर्षाच्या जून महिन्यापर्र्यंत टिकवून ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने शहरात पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. दरदिवशी ४२० एमएलडी पाणीपुरवठा होणाऱ्या ठिकाणी आता ३२० एमएलडी पाणीपुरवठा होत आहे.पर्यायी पाणीपुरवठा ( नवी मुंबई महानगरपालिका)ठिकाणविहिरीबेलापूर गाव २ शहाबाज१किल्ले गावठाण१नेरुळगाव १ सारसोळे२करावे२दारावे१कुकशेतगाव १वाशीगाव १ जुहूगाव १तुर्भे स्टोअर २ सानपाडा३तुर्भेगाव३इंदिरानगर१गणपतीपाडा१तुर्भे सेक्टर २१ १जलकुंभसेक्टर १९ अे, वाशीसेक्टर २०, वाशीसेक्टर ४ सानपाडातुर्भे स्टोअरबोअरवेलतुर्भे स्टोअर३ इंदिरानगर२पंप हाऊस सेक्टर ७ सीबीडी सेक्टर १९, नेरुळसेक्टर ३ वाशीसेक्टर ३० वाशीमनपाकडे एकच टँकर असून तीव्र पाणीटंचाईच्या असलेल्या ठिकाणी टँकर पुरवला जातो. मोरबे धरणाचा जलसाठा कमी असल्याने जपून पाणी वापरावे.- अरविंद शिंदे, कार्यकारी अभियंता(पाणीपुरवठा)
टँकर लॉबीचं चांगभलं
By admin | Updated: December 18, 2015 00:46 IST