शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

पाणजे पाणथळ क्षेत्राबाबत १२ आठवड्यांत निर्णय घ्या; पर्यावरण विभागाला मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

By नारायण जाधव | Updated: January 31, 2024 18:22 IST

उच्च न्यायालयाचा हा आदेश २९ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पाणजे पाणथळ क्षेत्राच्या वादावर सिडकोविरोधातील राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे ‘एकतर्फी आदेश’ मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केले आहेत. न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती जी. एस. पटेल यांच्या खंडपीठाने राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रमुख सचिवांना या विषयावर सिडकोव्यतिरिक्त एनएमआयआयएच्या (आधीचे नवी मुंबई सेझ) एका अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. याबाबतच्या सुणावणीसाठी पर्यावरणवादी कार्यकर्ते नंदकुमार पवार यांची उपस्थिती आवश्यक असल्याचे म्हटले आहे. २४ जानेवारी रोजीचा उच्च न्यायालयाचा हा आदेश २९ जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला आहे.

वनशक्तीचे स्टॅलिन डी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर पाणजेला अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यान घोषित करावे किंवा वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ अन्वये इतर संरक्षणात्मक दर्जा मिळावा, यासाठी याच खंडपीठामार्फत लवकरच सुनावणी होणार आहे.

या प्रकरणाची सुरुवात ११ नोव्हेंबर २०२० रोजी झाली होती. तेव्हा राज्याच्या पर्यावरण संचालकांनी सिडको आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना पाणजेला होणारा आंतरभरतीचा पाणीप्रवाह रोखला जाणार नाही याची खात्री करण्यास सांगितले. यापूर्वी पवार आणि नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी सरकारकडे तक्रारी केल्या. नवी मुंबई सेझला बेकायदेशीर सुरक्षा केबिन पाडण्याचा आदेशदेखील पर्यावरण संचालकांनी दिला होता.

या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने पवार यांनी एनजीटीच्या पश्चिम विभागीय खंडपीठाकडे अर्ज दाखल केला. एनजीटीने सिडको आणि रायगड जिल्हाधिकाऱ्यांना सरकारी आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगूनही त्याचेही पालन झाले नाही. त्यानंतर पवार यांनी एनजीटीकडे याचिका दाखल करून न्यायाधिकरणाने स्वतःच्या आदेशाची अंमलबजावणी करावी, अशी विनंती केली.

पर्यावरण संचालकांच्या आदेशाचे पालन केल्यानंतर सिडको आणि नवी मुंबई सेझने एनजीटीकडे पुनरावलोकन याचिका दाखल केली. एनजीटीच्या सहा सदस्यीय खंडपीठाने मूळ आदेश कायम ठेवून सिडको आणि जिल्हाधिकाऱ्यांना पाणजे ही पाणथळ जागा म्हणून कायम ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर सिडको आणि एनएमआयआयएने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. तीवर उच्च न्यायालयाने २५ जानेवारी रोजी हे निर्देश दिले होते.

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्ट