शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

तरणतलाव आठ वर्षे कागदावरच, नवी मुंबई महापालिकेची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 7:08 AM

शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - शहरात आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू असतानाही त्यांना दर्जेदार तरणतलाव उपलब्ध करून देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. तरणतलावासाठी सिडकोकडून भूखंड मिळूनही त्यावरील अवघ्या एका अनधिकृत बांधकामामुळे प्रत्यक्षात त्या ठिकाणी कामाला सुरुवात झाली नाही.सिडकोने २००९ साली वाशी सेक्टर १२ येथील १९६ क्रमांकाचा सुमारे चार हजार चौ.मी.चा भूखंड जलतरण तलावासाठी पालिकेकडे हस्तांतर केला आहे. त्यावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे जलतरणतलाव उभारण्याच्या हालचाली पालिकेने चालवल्या होत्या. त्याकरिता २०११च्या अर्थसंकल्पातही तरतूद करण्यात आली होती. प्रत्यक्षात मात्र आठ वर्षांनंतरही तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही.जागतिक स्तरावर महापालिकेचे नाव उंचावणारे जलतरणपटू शहरात राहायला आहेत. त्यांची सरावासाठी दर्जेदार तरणतलाव नसल्याने गैरसोय होत असून आर्थिक फटकाही बसत आहे. शहरात वास्तव्यास असलेल्या जलतरणपटूंमध्ये सुरभी टिपरे, लेखा कामत, ज्योत्सना पानसरे, विराज प्रभू, नचिकेत वाघमारे, शुभम वनमाळी आदींचा समावेश आहे. त्यांनी आशियाई तसेच राष्टÑकुल स्पर्धांमध्ये अनेक पुरस्कार मिळवले आहेत; परंतु अपेक्षित यश गाठण्यासाठी त्यांना सरावाकरिता आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरण तलावाची आवश्यकता आहे, असा तलाव व चांगले प्रशिक्षक शहरात नसल्याने अवघ्या काही तासांच्या सरावाकरिता त्यांना मुंबई, पुणे अथवा बंगळुरूला जावे लागत आहे. त्यापैकी बहुतांश जलतरणपटू पुण्यातील बालेवाडी येथे जातात. यामध्ये प्रवासातच जास्त वेळ जातो.शहरात काही खासगी क्रीडा संस्थांचे तरणतलाव असून, त्यांची लांबी २५ मीटरची व शुल्कही अधिक आहे; परंतु राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तराच्या स्पर्धा ५० मीटर लांबीच्या तरणतलावात होतात. यामुळे स्पर्धकांना सरावासाठी तेवढ्याच लांबीचा तरणतलाव आवश्यक आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात खासगी व पालिकेचे तरणतलाव आहेत. मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावर कौशल्य दाखवणारे सर्वाधिक जलतरणपटू नवी मुंबईत असतानाही, त्यांना पालिकेच्या तरणतलावाची प्रतीक्षा करावी लागत आहे. २०१३मध्ये तलावाच्या कामाची काढलेली सुमारे ४० कोटींच्या कामाची निविदा अतिक्रमणामुळे रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर ओढावली आहे. तलावासाठी राखीव भूखंडावरील शिवसेनेच्या अनधिकृत शाखेमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली नाही.महापालिकेतर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. त्याकरिता दर्जेदार शिक्षणाबरोबरच उत्तम खेळाडू घडवण्यावरही भर दिला जातो; परंतु स्वत:चे जलतरण तलाव नसल्याने पालिकेतर्फे होणाºया जलतरण स्पर्धाही खासगी तलावांमध्ये घ्याव्या लागतात, ही शोकांतिका आहे.तरणतलावासाठी भूखंड राखीव असतानाही त्यावरील अतिक्रमण हटवून प्रत्यक्षात कामाला वेळीच सुरुवात करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. यामध्ये राजकीय इच्छाशक्तीचाही अभाव दिसून येत आहे. परिणामी, शहरातील राष्टÑीय, आंतरराष्टÑीय दर्जाच्या जलतरणपटूंची गैरसोय होत असून, त्यांच्या यशाच्या मार्गात अनधिकृत बांधकामाचा अडथळा निर्माण झाला आहे.नवी मुंबईत ५० मीटर लांबीचा तलाव नसल्याने सरावासाठी मुंबईत जावे लागते. प्रवासातच वेळ जात असून, सरावादरम्यान थकवाही जाणवतो. पालिकेने सरावासाठी दर्जात्मक तरणतलाव उपलब्ध करून देणे अपेक्षित आहे.- जोत्सना पानसरे,आंतरराष्टÑीय जलतरणपटूअनधिकृत शाखेमुळे गेली अनेक वर्षे तरणतलावाच्या कामाला सुरुवात होऊ शकली नाही. तसेच वेळेत कामाला सुरुवात न झाल्याने काढलेली निविदाही रद्द करावी लागली आहे; परंतु लवकरच एनएमएमटी डेपो व जलतरण तलाव यांचा एकत्रित आराखडा तयार करून कामाला सुरुवात केली जाईल.- मोहन डगावकर,शहर अभियंता-न.मु.म.पा.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई