शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

Video : पालिकेतील एक अधिकाऱ्यासह पाच कर्मचारी एकाच वेळी निलंबन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 20:27 IST

वादग्रस्त पार्टी भोवली; आयुक्तांची कारवाई 

ठळक मुद्देया पार्टीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण दाखवित नृत्य करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबित केले आहे. पनवेल महापालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम महापालिकेत आयोजित करण्यात आला होता.

पनवेल  - पनवेल महापालिकेच्या मालकीच्या हौदावर एका कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याबद्दल पाणिपुरवठा विभागाच्या काही कर्मचा-यांनी आयोजित केलेली पार्टी या कर्मचा -यांच्या चांगलीच अंगलट आली आहे . या पार्टीचे व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन झाल्याचे कारण दाखवित नृत्य करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबित केले आहे. पनवेल महापालिकेतील एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम महापालिकेत आयोजित करण्यात आला होता. पाणीपुरवठा विभागातील या कर्मचाऱ्याचा सेवानिवृत्तीचा अधिकृत कार्यक्रम पार पडल्यानंतर पाणिपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी पनवेल एसटी स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या महापालिकेच्या हौदाजवळ  पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी मद्य सेवन करीत  चांगलाच धिंगाणा घातला होता . पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता रावसाहेब तायडे यांच्यासह इतर कर्मचारी नृत्य करीत असल्याचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला .शहरात सध्याच्या घडीला भीषण पाणी समस्याच निर्माण झाली असताना . पाणी पुरवठा अधिका-यांनी घातलेल्या या धिंगाण्यावर पनवेलकरांमध्ये असंतोष पसरला होता . आयुक्तांपर्यंत हा विषय गेल्यांनतर त्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत या पार्टीत सहभागी अधिकारी व कर्मचा-यांच्या निलंबनाचा निर्णय घेतला आहे . पाणिपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता रावसाहेब तायडे यांना निलंबित केल्याचा आदेश आयुक्त गणेश देशमुख यांनी काढला. तर पाणी पुरवठा विभागात किकिपर म्हणून कार्यरत असलेल्या  मनोहर गोंधळी, बाबू बांगारे, गुरूनाथ भगत, अर्जुन गायकवाड, दिलिप घोडेकर या पाच जणांना निलंबित केल्याचा आदेश उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी काढला आहे.  तसेच पाण्याच्या टाकीवर आयोजित केलेल्या पार्टीला जबाबदार म्हणून पंप ऑपरेटर संजय बहिरा आणि केसरी बहिरा या दोघांना प्रत्येकी ५ हजार रूपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला

 

 शासकीय कर्मचाऱ्याला अशोभनीय वर्तूणूक ठरेल अशी कोणतीही गोष्ट करता कामा नये या महाराष्ट्र नागरी सेवा कायद्याप्रमाणे निलंबित केल्याची आदेशात म्हटले आहे.महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ५६ नुसार नियमाचा भंग केल्याप्रकरणी हि कारवाई करण्यात आली आहे .महानगर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी केलेली कारवाई हि अद्याप पर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जात आहे .

टॅग्स :panvelपनवेलMuncipal Corporationनगर पालिकाsuspensionनिलंबनdanceनृत्य