शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अ‍ॅम्फिबीअस बस प्रकल्पाचा प्रस्ताव स्थगित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 02:49 IST

शहरात रोड व पाण्यातून चालणारी अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.

नवी मुंबई : शहरात रोड व पाण्यातून चालणारी अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव आठ महिन्यांनंतर पुन्हा सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता; परंतु राष्ट्रवादी काँगे्रसने या प्रस्तावास आक्षेप घेतला. विरोधी पक्षांनी मात्र ही बससेवा सुरू करण्याचा आग्रह धरला; परंतु सत्ताधारी नगरसेवकांचा विरोध असल्यामुळे तो पुन्हा स्थगित करण्यात आला.नेरुळ सेक्टर-२६ मधील ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये व शहरातील महत्त्वाच्या उद्यान परिसरामध्ये ही बस सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात आला होता. या बससेवेसाठी जवळपास जवाहरलाल नेहरू पतन न्यास (जेएनपीटी)ने ही बस महापालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. बसचा पूर्ण खर्च जेएनपीटीच करणार असून, उत्पन्नातील २५ टक्के वाटा पालिकेला दिला जाणार आहे. आयुक्तांनी फेब्रुवारी महिन्याच्या सर्वसाधारण सभेमध्ये हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला होता; परंतु त्या सभेमध्ये या बसमार्गाचा विस्तार करण्यात यावा. वाशीतील सागर विहार व तेथून ऐरोलीपर्यंत ही बससेवा नेण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी नगरसेवकांनी केली होती. यानंतर प्रशासनाने जेएनपीटीकडील अधिकाऱ्यांना या विषयी माहिती दिली होती. संबंधितांनी दोन्ही मार्गांचे परीक्षण केले होते. वाशीतील धारण तलावात तीव्र उतार व खडकाळ भाग असल्याने अ‍ॅम्फिबीअस बसचे परिचलन करणे शक्य नसल्याचे नमूद केले आहे. ऐरोली खाडीक्षेत्रात सदर बससेवा सुरू करण्याविषयी फेब्रुवारीमध्ये पाहणी केली होती. क्षेत्रीय वनाधिकारी एम. एस. बोथे यांच्याशीही चर्चा करण्यात आली. या क्षेत्रामध्ये वनविभागाकडून बोट सेवा सुरू आहे. हे क्षेत्र फ्लेमिंगो पक्ष्यांचे आश्रयस्थान असल्यामुळे तेथे सेवा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे प्रशासनाने ज्वेल्स आॅफ नवी मुंबईमध्ये अ‍ॅम्फिबीअस बस सेवा सुरू करण्याविषयीचा प्रस्ताव पुन्हा सर्वसाधारण सभेमध्ये मांडला होता. या विषयावर चर्चा सुरू होण्यापूर्वीच सभागृहनेते रवींद्र इथापे यांनी हा प्रस्ताव स्थगित करण्याची सूचना मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्यासह एम. के. मढवी व इतर नगरसेवकांनी सत्ताधाºयांच्या भूमिकेविषयी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावामुळे महापालिकेला काहीही खर्च येणार नाही. यामुळे हा प्रस्ताव मंजूर करावा, अशी भूमिका मांडली; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी प्रस्तावात त्रुटी असल्याचे कारण देऊन तो पुन्हा स्थगित केला आहे.>आयुक्तांनी घेतली हरकतसभागृहनेते रवींद्र इथापे यांनी चर्चा सुरू होण्यापूर्वीच बस प्रकल्प स्थगित करण्याची सूचना मांडली. यामुळे आयुक्त रामास्वामी एन. यांनी पाइंट आॅफ आॅर्डर म्हटले. सभागृहामध्ये नगरसेवक दुसºया सदस्याच्या भाषणावर पॉइंट आॅफ आॅर्डर घेत असतात; परंतु पहिल्यांदा आयुक्तांनी अशाप्रकारे हरकत घेतली. सत्ताधाºयांकडून प्रशासनाचे ठराव फेटाळण्याचे किंवा स्थगित करण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे आयुक्तांनी मध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा सुरू झाली होती. ही बस जेएनपीटी आपणास देणार असल्यामुळे पालिकेचे काहीही नुकसान होणार नसल्याचे स्पष्ट केले.>विरोधी पक्षाचे नगरसेवक आग्रहीविरोधी पक्षनेते विजय चौगुले, एम. के. मढवी, गटनेते द्वारकानाथ भोईर यांनी प्रशासनाने आणलेल्या प्रस्तावामुळे पालिकेचे नुकसान होणार नाही. बससेवा सुरू करणे आवश्यक आहे. सत्ताधाºयांनी विनाकारण त्याला विरोध करू नये, अशी भूमिका मांडली.>सत्ताधाºयांनाबसेसविषयी शंकासत्ताधारी राष्ट्रवादीचे अनंत सुतार, रवींद्र इथापे, देविदास हांडे-पाटील, सूरज पाटील यांनी या विषयावर चर्चा करताना विविध शंका उपस्थित केल्या. या प्रकल्पाला विरोध नाही; परंतु सागर विहार ते ऐरोली दरम्यान बससेवा सुरू करण्यासाठी नक्की काय सर्वेक्षण केले व इतर सर्व माहिती देण्याची मागणी केली. हांडे-पाटील यांनी या बसचा अपघात झाल्यास जबाबदार कोण? असा प्रश्नही उपस्थित केला.