शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

शस्त्रक्रियेत हलगर्जी भोवली; पाच जणांनी गमावली दृष्टी; अहवालानंतर डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 13:46 IST

वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : डोळ्यांची शस्त्रक्रियेतील  हलगर्जी केल्याने पाच जणांची दृष्टी गेल्याचा ठपका ठेऊन डॉक्टर पितापुत्रावर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डिसेंबमध्ये त्यांनी वाशीतील एका खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रिया केल्या होत्या. मात्र, त्यानंतर संसर्ग झाल्याने संबंधितांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक विभागाच्या अहवालावरून हा गुन्हा दाखल केला आहे.वाशी येथील पंडित आय सर्जरी अँड लेजर हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. डिसेंबर २०२४ मध्ये त्याठिकाणी शहराच्या विविध भागातील काही व्यक्तींनी डोळ्यांशी संबंधित आजारावर उपचार घेतले होते. त्यामध्ये काहींच्या डोळ्याची शस्त्रक्रिया केली होती. त्यापैकी पाच जणांना शस्त्रक्रियेनंतर डोळ्यांचा संसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेली होती. यामुळे त्यांनी शस्त्रक्रियेत झालेल्या हलगर्जी विरोधात वाशी पोलिसांकडे तक्रार केली होती. 

सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे गंभीर परिणामयाबाबत पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक विभागाला कळवून अहवाल मागवला होता. त्याचा अहवाल नुकताच पोलिसांना प्राप्त झाला असून, त्यात डोळ्यांच्या शस्त्रक्रियेत हलगर्जी झाल्याचे नमूद केले आहे. तर शस्त्रक्रियेनंतर संबंधितांच्या डोळ्यांना सुडोमोनास विषाणूंच्या बाधेमुळे हा गंभीर आजार झाल्याचेही अहवालावरून स्पष्ट झाले. त्यावरून उपचारानंतर दृष्टी गमावलेल्या पाच जणांच्या तक्रारीवरून डॉ. चंदन पंडित व डॉ. डी. व्ही. पंडित या पितापुत्रांवर वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी डॉक्टर चंदन पंडित महापालिकेच्या सेवेतगुन्हा दाखल झालेले डॉ. चंदन पंडित हे महापालिकेच्या ऐरोली येथील रुग्णालयात नोकरीला आहेत. यानंतरही ते वडिलांच्या नावे वाशीत असलेल्या रुग्णालयात प्रॅक्टिस करत होते. ही बाब प्रशासनाच्या दृष्टीतून सुटली कशी, याचेही आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान ऐरोली रुग्णालयात त्यांच्याकडून रुग्णांना जाणीवपूर्वक बाहेरची औषधे लिहून दिली जायची अशाही तक्रारी समोर येत आहेत.

नेमके घडले काय?डॉ. डी. व्ही. पंडित हे ज्येष्ठ नेत्रतज्ज्ञ म्हणून  परिचित आहेत. दृष्टी कमकुवत झाल्याने ते शस्त्रक्रिया करत नाहीत. यामुळे  रुग्णालयातील शस्त्रक्रिया मुलगा डॉ. चेतन  हाताळत होता, अशी माहिती समोर आली. त्यातूनच डिसेंबरमध्ये शस्त्रक्रियेनंतर या पाच रुग्णांना  संसर्ग होऊन दृष्टी गमवावी लागली.

टॅग्स :doctorडॉक्टरPoliceपोलिस