शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
4
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
5
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
6
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
7
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
8
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
9
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
10
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
11
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
12
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
13
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
14
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
15
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
16
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
17
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
18
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
19
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
20
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी

पाणीटंचाईवर विहिरी, कूपनलिकांची मात्रा कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 06:56 IST

पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पाणीटंचाई निवारण्याकरिता विहिरी, कूपनलिकांचे हे स्रोत पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे. याबाबत सभागृह आणि बाहेर फक्त चर्चाच होत आहे. पूर्वी नगरपालिका आणि आता महापालिकेकडून याविषयी ठोस पावले उचलण्यात येत नाही. म्हणून पनवेलकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. याबाबत उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात सिडको वसाहती आणि २९ महसुली गावांचा समावेश आहे. देहरंग धरणातील बारा एमएलडी पाण्याव्यतिरिक्त महापालिकेच्या मालकीचा दुसरा स्रोत नाही.पनवेल, नवीन पनवेल आणि कळंबोली वसाहती एमजेपीवर अवलंबून आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण टाटा पॉवरने सोडलेले पाणी उचलते आणि तेच सिडको वसाहतींना पुरवते. मात्र सुटीच्या दिवशी हा प्रकल्प बंद असल्याने नदीत पाणी येतच नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी पनवेलकरांना कमी पाणी मिळते. जुनाट झालेल्या जलवाहिन्यांमुळे मागणीप्रमाणे पाणी मिळत नाही. देहरंग धरण आटले असल्याने येथून पाणी मिळत नाही. त्यामुळे पनवेल शहराला पाणीटंचाई जाणवू लागली आहे.त्यात एमजेपी आणि एमआयडीकडून पाणीपुरवठा कमी झालाय. समाविष्ट केलेल्या अनेक गावांमध्ये पाण्याचा कोणताही स्रोत नाही. ती गावे बोअरवेलवर अवलंबून राहतात. एकंदरीतच कायमस्वरूपी पाणीपुरवठा व्हावा याकरिता एक स्वतंत्र धरण घेण्याबाबतचा पाठपुरावा सुरू आहे.मात्र ही बाब धोरणात्मक असल्याने त्याला विलंब लागेल. म्हणून तात्पुरती उपाययोजना म्हणून पनवेल महानगरपालिकेने आपल्या हद्दीतील विहिरी आणि कूपनलिकेतील पाण्याचा वापर करणे सयुक्तिक ठरेल अशी आग्रही मागणी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या अगोदरच सभागृहात केली होती. या स्रोताची साफसफाई केली तर टंचाई निवारण्याकरिता त्याचा चांगला वापर होवू शकते हे त्यांनी पटवून दिले आहे.गेल्या काही दिवसांपासून पाणीप्रश्नावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.विहिरी आणि कूपनलिकांचा मुद्दाही प्रकर्षाने पुढे आला आहे. महापालिका प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित आहे.परंतु याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही.पनवेल नगरपालिका, ग्रामपंचायत अस्तित्वात होती त्यावेळी सुध्दा याबाबत चर्चा होती. मात्र ठोस पावले उचलण्यात आली नाहीत त्यामुळे पनवेलकरांना पाण्याची कमतरता भासत आहे.जुन्या विहिरी आणि बोअरवेल या जलस्रोताचा वापर करण्याचा प्रस्ताव आमच्याकडे आहे. साफसफाई, गाळ काढण्याचे काम करावे लागणार आहे. त्याकरिता आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून नियोजन सुरू आहे. आम्ही एमजेपीकडून तीनपेक्षा जास्त एमएलडी पाणी वाढवून घेतले आहे. त्यामुळे फारशी टंचाई निर्माण होणार नाही.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :WaterपाणीNavi Mumbaiनवी मुंबई