शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाचा तणाव! दोन अल्पवयीन मुलांच्या आत्महत्या; नेरुळ आणि करावे मधील धक्कादायक घटना  

By सूर्यकांत वाघमारे | Updated: December 11, 2023 19:58 IST

दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबई : दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. नेरुळ व करावे येथे या घटना घडल्या असून दोन्ही मुलांना अभ्यासाचा तणाव होता असे समोर आले आहे. त्यामुळे एकाने तलावात उडी मारून तर दुसऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. जड झालेल्या शिक्षणाचा भार विद्यार्थी पेलवू शकत नसल्याचे धक्कादायक घटनेवरून समोर आले आहे. नवी मुंबईत काही तासाच्या अंतराने दोन अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्या आहेत. नेरुळ व करावे गाव याठिकाणी या घटना घडल्या असून त्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. करावे येथे राहणाऱ्या दर्शील पाटील (१५) याच्या वडिलांचे वर्षभरापूर्वी निधन झाले आहे. वडिलांच्या निधनानंतर आई त्याचे व त्याच्या लहान बहिणीचे संगोपन करत आहे. यामुळे दर्शील याच्यावर कुटुंबियांच्या अपेक्षा होत्या. मात्र अभ्यास जड जात असल्याने आपण कुटुंबाच्या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही असे सतत त्याला वाटत होते. यामुळे त्याचे मानसिक खच्चीकरण झाले होते. अखेर रविवारी मध्यरात्री त्याने आपण आत्महत्या करत असल्याचा मॅसेज बहिणीसह कुटुंबियांना पाठवला होता. सोमवारी पहाटे तो घरात आढळून न आल्याने परिसरात त्याचा शोध सुरु असताना करावे येथील तलावालगत त्याची चप्पल आढळून आली. यामुळे पाण्यात शोध घेतला असता त्याचा मृतदेह आढळून आला.

तर नेरुळ सेक्टर १६ येथील पृथ्वी प्रमोद ढवळे (१४) याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. तो नववी मध्ये शिकत होता. रविवारी संध्याकाळी त्याच्या घरातील सर्वजण खरेदीसाठी घराबाहेर गेले होते. यामुळे तो घरात एकटाच असताना त्याने बेडशीटच्या साहाय्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. रात्री अकराच्या सुमारास घरातील परत आल्या असता दरवाजा आतून बंद होता. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने दरवाजा तोडला असता पृथीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. अभ्यास कठीण जात होता असे पोलिस तपासात समोर आले आहे. यामध्ये त्याने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला. अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केल्याच्या दोन्ही घटनांनी शहरात पालक वर्गांमध्ये खळबळ उडाली आहे.

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईDeathमृत्यू